अनुसूचित जाती कल्याण समितीचा दि. १९ व २० रोजी दौरा
अनुसूचित जाती कल्याण समितीचा दि. १९ व २० रोजी दौरा
अकोला, दि. 19 :महाराष्ट्र विधानमंडळाची अनुसूचित जाती कल्याण समिती दि. १९ व २० ऑगस्ट रोजी अकोला येथे येत आहे. या दौ-यात विविध कार्यालयांतील भरती व अनुषंगिक बाबींचा, तसेच योजनांचा आढावा, संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा आणि विकासकामांची पाहणी आदी कार्यक्रम होतील.
समितीत आमदार नारायण कुचे हे समितीप्रमुख असून, आमदार सर्वश्री भीमराव केराम, तान्हाजी मुटकुळे, डॉ. अशोक माने, श्याम खोडे, मंगेश कुडाळकर, नरेंद्र भोंडेकर, संजय बनसोडे, सचिन पाटील, गजानन लवटे, संजय मेश्राम, अमित गोरखे, जगन्नाथ अभ्यंकर आदींचा समावेश आहे. समितीसह अवर सचिव जयश्री म्हात्रे, कक्ष अधिकारी राहूल लिंगरवार, समितीप्रमुखांचे स्वीय सहायक रणजीत गमरे उपस्थित असतील.
समितीचा दौरा : दि. १९ ऑगस्टला सकाळी ९ ते १० वा. दरम्यान शासकीय विश्रामगृह येथे लोकप्रतिनिधी व मागासवर्गीय संघटनांचे प्रतिनिधी यांच्यात अनौपचारिक चर्चा होईल. सकाळी १० ते ११ दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयातील अनुसूचित जातीच्या प्रवर्गातील अधिकारी, कर्मचारी यांची भरती, बढती, आरक्षण, अनुशेष, जात पडताळणीविषयक बाबीसंदर्भात व कल्याणकारी योजनांबाबत संबंधित अधिका-यांसमवेत चर्चा होईल.
जिल्हाधिकारी कार्यालय येथे विविध कार्यालयांचा आढावा
सकाळी ११ ते ११. ३० दरम्यान जिल्ह्यातील सर्व नगरपालिका कार्यालयातील भरती, आरक्षण, अनुशेष व योजनांच्या अंमलबजावणीबाबत चर्चा जिल्हाधिकारी कार्यालयात होईल. स. ११.३० ते १२ वा. उपवनसंरक्षक, विभागीय वनअधिकारी, दु. १२ ते १२.३० वा. महावितरण कार्यालय, तसेच दु. १२.३० ते १ वा. दरम्यान राज्य मार्ग परिवहन महामंडळ, दु. १ ते १.३० दरम्यान प्रादेशिक परिवहन कार्यालय आणि दु. १.३० ते २ दरम्यान राज्य उत्पादन शुल्क या कार्यालयाचा आढावा घेतला जाईल.
जिल्हा परिषदेत आढावा
जिल्हा परिषदेतील भरती, आरक्षण, अनुशेष व योजनांच्या अंमलबजावणीबाबत चर्चा जि. प. कार्यालयात दु. २.३० ते ३.३० वा. दरम्यान होईल. त्यानंतर जि. प. कार्यालय येथेच जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाचा आढावा दु. ३.३० ते ४ दरम्यान व त्यानंतर अनुक्रमे सार्वजनिक बांधकाम विभाग, पशुसंवर्धन अधिकारी, आरोग्य उपसंचालक, शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी, कृषी विभाग यांचा आढावा घेतला जाईल. त्यानंतर शासकीय विश्रामगृह येथे मुक्काम.
दुस-या दिवशी महापालिकेत आढावा बैठका
गुरूवार, दि. २० ऑगस्ट रोजी महानगरपालिका कार्यालय येथे सकाळी १० ते ११ दरम्यान महापालिका कार्यालय व सकाळी ११ ते ११.३० वा. दरम्यान पोलीस अधिक्षक कार्यालयाचा आढावा होईल.
सकाळी ११.३० ते १२ दरम्यान जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाचा आढावा होईल. त्यानंतर अनुक्रमे समाजकल्याण सहायक आयुक्त, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ व एमआयडीसी व जिल्हा उद्योग केंद्राचा आढावा होईल. यादिवशी दु. २.३० ते ५ दरम्यान जिल्ह्यातील मागासवर्गीय उपयोजना क्षेत्रांतर्गत शासकीय व अनुदानित शाळा, वसतिगृह, महापालिका, जि. प. व न. प. यंत्रणांकडून करण्यात आलेल्या विविध विकासकामांना भेटी देण्यात येणार आहेत.
०००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा