स्वाधारसाठी शासकीय वसतिगृहाचा अर्ज भरणे बंधनकारक
स्वाधारसाठी शासकीय वसतिगृहाचा अर्ज भरणे बंधनकारक
अकोला, दि. १० : अनुसूचित जाती व नवबौध्द
प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहात
प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यापैकी अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील इयत्ता 11 वी
12 वी तसेच इयत्ता 12 वी नंतरच्या व्यावसायिक
व अव्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये प्रवेश मिळालेल्या
विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण घेता यावे म्हणुन भोजन, निवास व इतर शैक्षणिक सुविधा
या विद्यार्थ्यांना स्वत्: उपलब्ध करुन घेण्यासाठी आवश्यक रक्कम विद्यार्थ्यांच्या
आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट जमा करण्याकरिता
शासनाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरु केली आहे.
सन 2026-27 मध्ये स्वाधार योजनेचा लाभ घेणेकरिता इयता 12वी नंतरच्या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या पात्र विद्यार्थ्यांनी प्रथम शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी
दिनांक 15/09/2026 पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर
करणे बंधनकारक आहे. तसेच प्रवेश प्रक्रिया अंतिम करावयाचा दिनांक 22/09/2026 असुन https://hmasnew.mahait.org/ या संकेत स्थळावर रितसर ऑनलाईन अर्ज करणे बंधनकारक
आहे.गुणवत्तेनुसार अथवा जागेअभावी विद्यार्थ्यांला शासकीय वसतिगृह प्रवेश मिळाला नाही तरच विद्यार्थी/
विद्यार्थीनी स्वाधार योजनेच्या लाभासाठी पात्र राहील.
जे विद्यार्थी शासकीय वसतिगृहासाठी अर्ज करणार नाहीत त्यांना
स्वाधार योजना तसेच शासकीय वसतिगृह योजनांचा लाभ मिळणार नाही. सहायक आयुक्त समाज कल्याण
यांचेवतीने सर्व पात्र विद्यार्थ्यांना चालु शैक्षणिक वर्षात शासकीय वसतिगृहासाठी वेळेत
अर्ज नोदंविण्याचे आवाहन केले आहे. जेणे करुन भविष्यात स्वाधार योजनेचा लाभ देण्यास
कोणतेही तांत्रिक अडचण येणार नाही, सहायक आयुक्त मारोती वाठ यांनी कळविले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा