उच्च शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना मोठा दिलासा ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले 'आधार' आणि पंडित दिनदयाळ उपाध्याय 'स्वयंम' योजनेंतर्गत विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित
उच्च शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना मोठा दिलासा
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले 'आधार' आणि पंडित दिनदयाळ उपाध्याय 'स्वयंम'
योजनेंतर्गत विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित
अकोला, दि. २४ : महाराष्ट्र शासनाकडून वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या गरजू व होतकरु विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सत्र २०२६-२७ साठी 'ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना' आणि 'पंडित दिनदयाळ उपाध्याय स्वयंम योजना' अंतर्गत अर्ज स्वीकारण्याची ऑनलाईन प्रक्रिया १२ ऑगस्ट पासून अधिकृतपणे सुरू झाली असून इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडून अर्ज मागविण्यात आले आहे, अशी मा हि ती सहाय्यक संचालक अभिजीत काळे यांनी प्रसि ध्दी पत्रकाव्दारे दि ली आहे.
इयत्ता १२ वी नंतर व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये उच्च शिक्षण घेणाऱ्या, परंतु शासकीय किंवा संस्थात्मक वसतिगृहात मोफत प्रवेश न मिळालेल्या इतर मागास वर्ग (OBC), विमुक्त जाती व भटक्या जमाती (VJNT), विशेष मागास प्रवर्ग (SBC) आणि भटक्या जमाती 'क' प्रवर्गातील विद्यार्थ्यांना या योजनांचा थेट लाभ मिळणार आहे.
विद्यार्थ्यांच्या निवारा, भोजन आणि निर्वाह भत्त्याची रक्कम थेट त्यांच्या आधार-संलग्न बँक खात्यात (DBT) जमा केली जाणार आहे.
योजनेच्या प्रमुख अटी व शर्ती :
या योजने अंतर्गत विद्यार्थी वसतिगृह प्रवेशासाठी पात्र असावा आणि महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे अनिवार्य आहे, विद्यार्थी हा इयत्ता १२ वी नंतरचे उच्च शिक्षण घेत असलेला असावा. अर्ज करण्यासाठी सामान्य विद्यार्थ्यांना किमान ६०% आणि दिव्यांग विद्यार्थ्यांना किमान ५०% गुण असणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न रु. २.५० लाखांपेक्षा जास्त नसावे, तसेच वयोमर्यादा ही कमाल वय ३० वर्षांपेक्षा अधिक नसावी, विद्यार्थी ज्या शहरात/तालुक्यात शिकत आहे, त्याच शहराचा तो मूळ रहिवाशी नसावा. विद्यार्थी कुठल्याही प्रकारची नोकरी किंवा व्यवसाय करत नसलेला असावा, विद्यार्थ्याने स्वतःचा आधार क्रमांक आपल्या राष्ट्रीयकृत बँक खात्याशी जोडणे (Link करणे) बंधनकारक राहील.
या योजने अंतर्गत योजनेच्या लाभासाठी आवश्यक प्रमाणपत्रे पुढीलप्रमाणे : सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेला जातीचा दाखला (OBC/VJNT/SBC/NT-C), विद्यार्थी अनाथ असल्यास महिला व बाल विकास विभागाकडील अनाथ प्रमाणपत्र, दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी जिल्हा शल्य चिकित्सकांचे (Civil Surgeon) ४०% पेक्षा जास्त अपंगत्व असलेले प्रमाणपत्र आदी महत्वाचे प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. पात्र आणि इच्छुक विद्यार्थ्यांनी hmasnew.mahait.org या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन पद्धतीने आपले अर्ज मुदतीत सादर करावेत, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा