जिल्ह्यात पुढील चार दिवस पावसाची शक्यता हवामान केंद्राचे अनुमान
जिल्ह्यात पुढील चार दिवस पावसाची शक्यता हवामान केंद्राचे अनुमान अकोला, दि. ३० : नागपूरच्या प्रादेशिक हवामान केंद्रातर्फे अकोला व नजिकच्या जिल्ह्यांत आजपासून (३० जून) दि. ४ जुलैपर्यंत अतिवृष्टी व पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. वीज व पावसापासून बचावाकरीता सुरक्षित ठिकाणी आश्रय घेण्यात यावा. अशा स्थितीत झाडाखाली आश्रय घेऊ नये. या कालावधीत रस्त्याचे अंडरपास, नाल्या, खड्डे, सखल भाग किंवा पाणी साठते अशा जागेवर जाणे टाळावे. पूर आलेल्या पुलावरून जाऊ नये. जनावरांना झाडांना किंवा वीजेच्या तारेखाली बांधू नये. वीज चमकताना मोबाईल व वीज उपकरणे बंद ठेवावी. वाहन वीजेच्या खांबापासून दूर ठेवावे. वीज पडण्याची सूचना मिळविण्यासाठी दामिनी ॲप डाऊनलोड करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. ०००