स्व. बिडकर हे विविध क्षेत्रांचे जाणकार व कार्यशील नेतृत्व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून श्रद्धांजली









 स्व. बिडकर हे विविध क्षेत्रांचे जाणकार व कार्यशील नेतृत्व

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून श्रद्धांजली

अकोला, दि. १५ : विदर्भ वैधानिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष तथा मुर्तीजापूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार स्व. तुकाराम बिडकर हे विविध क्षेत्रांचे जाणकार व विकासासाठी कार्यशील नेतृत्व होते. त्यांच्या जाण्याने मोठी हानी झाली असल्याची भावना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज येथे व्यक्त केली.

 

उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी स्व. बिडकर यांच्या अकोला येथील रामनगर परिसरातील निवासस्थानी भेट देऊन त्यांच्या कुटुंबीयांची विचारपूस केली व सांत्वन केले. खासदार सुनील तटकरे, आमदार किरण सरनाईक, आमदार विक्रम काळे, आमदार अमोल मिटकरी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

स्व. बिडकर यांचे सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक, क्रीडा क्षेत्रात मोठे कार्य आहे. ते अष्टपैलू व्यक्तिमत्व, लोकांच्या सुखदुःखाशी समरस होणारे सच्चे लोकनेते होते. ते सामाजिक प्रश्नांची जाण असलेले व विकासासाठी कार्यशील नेतृत्व होते, अशी भावना उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी यावेळी व्यक्त केली.   

०००  

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन