कवी प्रशांत असनारे यांना शासनाचा बालकवी पुरस्कार प्रदान
कवी प्रशांत असनारे यांना
शासनाचा बालकवी पुरस्कार प्रदान
अकोला, दि. २८ : अकोल्याचे
कवी प्रशांत असनारे यांना ‘मोराच्या गावाला जाऊया’ या बालकवितासंग्रहासाठी मराठी भाषा
गौरव दिनानिमित्त मुंबईत गुरूवारी झालेल्या शासकीय समारंभात बालकवी पुरस्कार प्रदान
करण्यात आला. पुरस्काराचे स्वरूप ५० हजार रू., मानपत्र व सन्मानचिन्ह असे आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत
गेट वे ऑफ इंडिया परिसरात हा कार्यक्रम झाला. राज्याचे मराठी भाषा मंत्री उदय सामंत,
साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष
डॉ. रवींद्र शोभणे आदी उपस्थित होते.
श्री. असनारे यांचे 'मीच माझा मोर ', ' वन्स मोर ' आणि 'मोराच्या गावाला जाऊया' (बालकुमार कवितासंग्रह)
हे संग्रह प्रसिद्ध झाले असून, नाशिकचा विशाखा पुरस्कार , इचलकरंजीचा इंदिरा संत पुरस्कार , विदर्भ साहित्य
संघाचा शरच्चंद्र मुक्तिबोध पुरस्कार अशा एकूण ११ राज्यस्तरीय पुरस्कारांनी या संग्रहांना
गौरविण्यात आले आहे. 'मीच माझा मोर' या संग्रहाच्या उर्दू अनुवादाला सन २०२० साली साहित्य
अकादमी पुरस्कार मिळाला होता.
०००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा