जिल्ह्यात २७ हजार ४१३ व्यक्तींना घरकुलाचा लाभ पालकमंत्र्यांच्या हस्ते शनिवारी मंजुरीपत्रांचे वितरण
जिल्ह्यात २७ हजार ४१३ व्यक्तींना घरकुलाचा लाभ
पालकमंत्र्यांच्या हस्ते शनिवारी मंजुरीपत्रांचे वितरण
अकोला, दि. २१ : प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेच्या दुस-या टप्प्यात
जिल्ह्यातील २७ हजार ४१३ लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ मिळणार आहे. पालकमंत्री ॲड. आकाश
फुंडकर यांच्या अध्यक्षतेत प्रातिनिधीक स्वरूपात ‘गृहोत्सव’- मंजुरीपत्र वाटपाचा कार्यक्रम
उद्या, दि. २२ फेब्रुवारी दु. ३.३० वा. सिव्हील लाईन येथील जि. प. संविधान सभागृहात
होणार आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास
मंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत राज्यातील २० लाख लाभार्थ्यांना मंजुरीपत्र
वितरण, १० लाख व्यक्तींना पहिला हप्ता वितरण राज्यस्तरीय कार्यक्रमात होईल. त्याचे
प्रक्षेपण जिल्हास्तरीय कार्यक्रमात केले जाणार आहे.
तालुका स्तरावर पंचायत समिती सभागृहात आमदार व लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत,
तसेच ग्रामपंचायत स्तरावर सरपंच यांच्या अध्यक्षतेत मंजुरीपत्र वितरण कार्यक्रम होणार
असून, राज्यस्तरीय कार्यक्रमाचे प्रक्षेपणही केले जाणार आहे. लाभार्थी व अधिकाधिक नागरिकांनी
उपस्थित राहण्याचे आवाहन जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी बी. वैष्णवी यांनी केले आहे.
०००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा