अल्पसंख्याक समिती सदस्य पदासाठी स्वयंसेवी संस्थांकडून अर्ज मागविले
अकोला, दि. १२ : जिल्हा नियोजन कार्यालयांतर्गत अल्पसंख्याक समितीत जिल्ह्यातील अल्पसंख्याकांसाठी कार्य करणाऱ्या तीन स्वयंसेवी संस्थाच्या प्रतिनिधींची नियुक्ती करण्यात येणार आहे. त्यासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.
अर्जासह संस्थेला धर्मादाय आयुक्त किंवा इतर प्राधिकरण यांनी प्रदान केलेले नोंदणी प्रमाणपत्र, धार्मिक/भाषिक अल्पसंख्यांक दर्जा प्राप्त प्रमाणपत्र, घटना व उद्देश, अल्पसंख्यांक समाजाकरीता केलेले कार्य, मागील तीन वर्षांचे लेखा परीक्षण अहवाल, संस्थेच्या सदस्यांमध्ये कोणतेही न्यायिक वाद नसल्याबाबत स्टॅम्प पेपरवर नोटरीकडे नोंदणीकृत प्रमाणपत्र, संस्थेचे प्रतिनिधी अकोला जिल्ह्यातील रहिवासी असल्याची कागदपत्रे आदी जोडणे आवश्यक आहे.
इच्छुक स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींनी आपला अर्ज आवश्यक कागदपत्रांसह जिल्हा नियोजन समिती, नियोजनभवन, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, अकोला येथे दि. 17 फेब्रुवारीपर्यंत दोन प्रतीमध्ये कार्यालयीन वेळेत सादर करावा. विहित मुदतीनंतर प्राप्त झालेले प्रस्ताव ग्राह्य धरले जाणार नाहीत.
०००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा