माजी सैनिकांना नोंदणी करण्याचे आवाहन

 

माजी सैनिकांना नोंदणी करण्याचे आवाहन

अकोला, दि. २८ : सैनिक कल्याण विभागाच्या कोणत्याही योजनेचा लाभ घेण्यासाठी दि. १ एप्रिलपासून संकेतस्थळावर नोंदणी आवश्यक आहे. त्यामुळे माजी सैनिक, दिवंगत सैनिकांच्या पत्नी, अवलंबित यांनी दि. ३१ मार्चपूर्वी नोंदणीकृत व्हावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.

 

विभागातर्फे सर्व संबंधित माहितीचे संगणकीकरण करण्यात येत आहे. कोणत्याही सेवेसाठी यापुढे www.ksb.gov.in आणि  www.mahasainik.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर नोंदणीकृत असणे आवश्यक आहे. त्यामुळे संबंधितांनी किमान १ एमबी क्षमतेत कागदपत्रे अपलोड करावीत. कार्यालयाद्वारे दिलेले ओळखपत्र गरजेचे असून, छायाचित्र, आधारपत्र, पॅनकार्ड, सैन्य सेवापुस्तकाची सर्व पाने, पीपीओ, ईसीएचएस कार्ड, पॅशन बँक पासबुक, शैक्षणिक प्रमाणपत्र आदी कागदपत्रे अपलोड करावी लागणार आहेत. अधिक माहितीसाठी ०७२४-२४३३३७७ या क्रमांकावर संपर्क साधावा.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूकीसाठी 70 उमेदवारांचे अर्ज कायम