बाल हक्क संरक्षण आयोगातर्फे जिल्हाधिकारी अजित कुंभार यांना पुरस्कार
बाल हक्क संरक्षण आयोगातर्फे
जिल्हाधिकारी अजित कुंभार यांना पुरस्कार
अकोला, दि. २१ : महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाद्वारे ‘बालस्नेही पुरस्कार-२०२४’अंतर्गत उत्कृष्ट जिल्हाधिकारी पुरस्कारासाठी अमरावती विभागातून अकोल्याचे जिल्हाधिकारी अजित कुंभार यांची निवड झाली आहे. आयोगाच्या अध्यक्ष ॲड. सुशीबेन शाह यांनी ही निवड जाहीर केली.
मुंबईत यशवंतराव चव्हाण सेंटर येथे दि. ३ मार्च रोजी कार्यक्रमात जिल्हाधिका-यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे, गृह राज्यमंत्री योगेश कदम, महिला व बालविकास राज्यमंत्री मेघना बोर्डीकर आदी मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित राहतील.
जिल्ह्यात बाल हक्क सप्ताहानिमित्त अनेक उपक्रम राबविण्यात आले. महिला व बालविकास भवन, वन स्टॉप सेंटरसाठी जागा मिळविणे, १०९८ स्टीकर्सवाटप, महिला राज्यगृहातील २ अनाथ विद्यार्थिनींना अभय केंद्रात कंत्राटी नोकरी, बालगृहातील बालकांना आवश्यक सुविधांची पूर्तता, बाल हक्क व मतदार जनजागृती तसेच बालविवाहाला प्रतिबंधासाठी सर्वंकष प्रयत्न करण्यात आले.
०००
आदरणीय सर आपले हार्दिक अभिनंदन
उत्तर द्याहटवा