लोकशाही सभागृहात साजरा होणार मराठी भाषा गौरव दिन
अकोला, दि. २६ : जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही सभागृहात उद्या दि. २७ फेब्रुवारी रोजी दु. ४ वाजता मराठी भाषा गौरव दिनानिमित्त ’मराठी भाषा संवर्धन काळाची गरज’ या विषयावर व्याख्यान कार्यक्रम होणार आहे.
ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त कवी कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवसानिमित्त शासनातर्फे मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो. या कार्यक्रमाला अधिकारी, कर्मचारी, नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
०००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा