राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्षांकडून शाळांची पाहणीराज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्षांकडून शाळांची पाहणी
अकोला, दि. ११ : महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष (मंत्री
दर्जा) प्यारे जिया खान यांनी जिल्ह्यात येथील शासन अनुदानित उर्दू शाळांना भेट देऊन
त्यांची पाहणी केली.
उर्दू शाळांच्या स्थितीची पाहणी करण्यासाठी श्री. खान ठिकठिकाणी दौरे
करत आहेत. त्यात त्यांनी आज पातूर येथील उर्दू शाळेला भेट दिली. पातुर येथील
उर्दू शाळेबाबत काही तक्रारी अल्पसंख्याक आयोगाला प्राप्त झाल्या होत्या. या पार्श्वभूमीवर
श्री. खान यांनी या शाळांना भेट देऊन वस्तुस्थिती जाणून घेतली. शिक्षणाधिकारी सुचिता
पाटेकर व पोलीस उपअधिक्षक गजानन पडघन यांच्यासह अल्पसंख्याक आयोगाचे अधिकारी उपस्थित
होते.
शाळाभेटीदरम्यान श्री. खान यांनी विविध शिक्षकांची भेट घेऊन त्यांच्या
तक्रारी जाणून घेतल्या. संस्थेत गैरकारभार, शोषण आदी गंभीर तक्रारी असून, याबाबत संपूर्ण
तपास करून जबाबदार व्यक्तींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश श्री. खान यांनी दिले.
श्री. खान यांनी अकोल्याचे पोलीस अधिक्षक बच्चन सिंह यांच्याशी चर्चा
करून विविध बाबींची माहिती जाणून घेतली. अल्पसंख्याक आयोगाच्या अध्यक्षांकडून राज्यभरातील
सर्व जिल्ह्यांना भेटी देऊन उर्दू शाळांच्या स्थितीचा आढावा घेतला जात आहे. अल्पसंख्याक
समाजातील जागरुक नागरिक, स्वयंसेवी संस्था व शिक्षक आदींनी काही तक्रारी असल्यास राज्य
अल्पसंख्यांक आयोगाकडे संपर्क साधावा, असे आवाहन श्री. खान यांनी केले आहे.
०००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा