शेततळे खारपाणपट्ट्यातील शेतीसाठी वरदान - अर्ज करण्याचे जिल्हाधिका-यांचे आवाहन

 

शेततळे खारपाणपट्ट्यातील शेतीसाठी वरदान

-        अर्ज करण्याचे जिल्हाधिका-यांचे आवाहन

अकोला, दि. १५ : खारपाणपट्ट्यातील शेतीसाठी शेततळे वरदान ठरू शकते. मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेत शेततळ्यांसाठी चांगले अनुदान मिळते. त्यामुळे अकोला जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतक-यांनी अर्ज करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी केले आहे.

जिल्ह्यातील बहुतांश शेती पावसावर अवलंबून असलेली कोरडवाहू शेती आहे. विविध भागातील पावसाचे असमान वितरण व पावसातील अनिश्चित खंड यासारख्या नैसर्गिक आपत्तीही अनेकदा उद्भवतात. सिंचनाअभावी पीकाचे उत्पादन घटते. अनेकदा पाण्याअभावी पीके नष्टही होतात. जेव्हा मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो तेव्हा झरे, ओढे, नाले, नदीद्वारे वाहून जाते, अशा पाण्याची शेततळ्यात साठवणूक शक्य आहे. त्यामुळे शेती उत्पादनात व शेतक-यांच्या उत्पन्नात वाढ होते. शेतक-यांनी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाधिका-यांनी केले.

 

वैयक्तिक शेतकरी या घटकात १५ बाय १५ बाय ३ मी. आकारमान असल्यास २३ हजार ८८१ रू., २० बाय २० बाय ३ मी. आकारमान असल्यास ४३ हजार ६७८ रू., २५ बाय २५ बाय ३ मी. आकार असल्यास ७० हजार ४५५ रू. व ३० बाय ३० बाय ३ मी. आकारमान असलेल्या शेततळ्यासाठी ७५ हजार रू. अनुदान मिळते.  

शेतक-यांनी mahadot.maharashtra.gov.in  या संकेतस्थळावर

ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. अर्जदाराच्या नावावर ०.६० हेक्टर क्षेत्र असावे. क्षेत्राबाबत कमाल मर्यादा नाही. काही अडचण किंवा माहिती हवी असल्यास कृषी सहायक, तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे यांनी केले.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूकीसाठी 70 उमेदवारांचे अर्ज कायम