महिलाभगिनींच्या श्रमातून ‘माविम’च्या रोपट्याचे वृक्षात रूपांतर - जिल्हा महिला व बालविकास अधिकारी गिरीश पुसदकर
महिलाभगिनींच्या श्रमातून ‘माविम’च्या रोपट्याचे वृक्षात
रूपांतर
-
जिल्हा महिला व बालविकास अधिकारी गिरीश पुसदकर
अकोला, दि. २७ : महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) महिलांच्या आर्थिक
सक्षमीकरणासाठी दमदार वाटचाल करत आहे. ५० वर्षापूर्वींच्या या रोपट्याचा आता महावृक्ष
झाला असून, त्यामागे खेड्यापाड्यातील महिलाभगिंनीचे परिश्रम आहेत, असे प्रतिपादन जिल्हा
महिला व बालविकास अधिकारी गिरीश पुसदकर यांनी आज येथे केले.
‘माविम’च्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त कार्यक्रम मलकापूर येथील स्व.
लोभाजी आप्पा गवळी मंगल भवनात आज झाला, त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा माहिती अधिकारी
हर्षवर्धन पवार, महामंडळाच्या जिल्हा समन्वय अधिकारी वर्षा खोब्रागडे, बाल संरक्षण
अधिकारी राजू लाडुलकर आदी उपस्थित होते.
श्री. पुसदकर म्हणाले की, महिला बचत गटांच्या उत्पादनांसाठी स्वतंत्र
बाजारपेठ विकसित होणे आवश्यक आहे. गटांनी लोणची, पापड, मसाला आदी उत्पादनांपुरते मर्यादित
न राहता बाजारपेठेचा वेध घेऊन नवनवी उत्पादने आणावीत. उत्पादनांच्या ब्रॅडिंगसाठी प्रयत्न
करावेत. श्री. पवार यांनीही मनोगत व्यक्त केले. वन स्टॉप सेंटरच्या भित्तीपत्रकाचे
प्रकाशन यावेळी झाले.
यावेळी बचत गटांमुळे परिवर्तनाबाबत रशिदा बी शेख व शोभा लाहोडे यांनी
अनुभवकथन केले. श्रीमती खोब्रागडे यांनी प्रास्ताविक केले.
०००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा