विणकरांसाठी हातमाग कापड स्पर्धा
विणकरांसाठी हातमाग कापड स्पर्धा
अकोला, दि. २८ : राज्याच्या वस्त्रोद्योग विभागातर्फे अमरावती व नागपूर
विभागातील हातमाग विणकर बांधवांसाठी विभागीय हातमाग कापड स्पर्धा घेण्यात येत असून,
त्यासाठी दि. ५ मार्चपर्यंत कापडाचे तयार नमुने सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
उत्कृष्ट हातमाग कापड नमुन्यांना प्रोत्साहन देऊन विणकरांना गौरविण्यासाठी
ही स्पर्धा घेण्यात येते. नागपूरच्या वस्त्रोद्योग प्रादेशिक उपायुक्त कार्यालयातर्फे
मार्च महिन्यात ही स्पर्धा होणार आहे. इच्छूकांनी दि. ५ मार्चपर्यंत प्रादेशिक उपायुक्त
वस्त्रोद्योग, प्रशासकीय इमारत क्र. २, आठवा माळा, बी विंग, सिव्हिल लाईन्स, नागपूर
येथे तयार कापडाचे नमुने सादर करावेत. अधिक माहितीसाठी प्रादेशिक उपायुक्त कार्यालयाशी
(०७१२) २५३७९२७ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.
०००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा