पाणलोट यात्रेचे बटवाडीत जल्लोषात स्वागत
पाणलोट यात्रेचे बटवाडीत जल्लोषात स्वागत
अकोला, दि. २४ ; गावशिवारातील पाण्याच्या व्यवस्थापनाविषयी विधायक संदेश
व मार्गदर्शन करणा-या पाणलोट यात्रेचा बडवाडी बु. येथे रविवारी शुभारंभ झाला. गावक-यांकडून
यात्रेचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.
गावातील आबालवृद्धांनी पाणलोट यात्रेला हजेरी लावून जल व्यवस्थापनाची
माहिती घेतली. प्रारंभी जि. प. शाळेच्या विद्यार्थ्यांकडून प्रभातफेरी काढण्यात आली.
शालेय विद्यार्थ्यांच्या निबंध व चित्रकला स्पर्धा यानिमित्त घेण्यात आल्या होत्या.
त्यातील गुणवंतांना बक्षीसे देण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच श्रीमती
आखरे होत्या.
पाणलोट प्रकल्पात उत्कृष्ट कामगिरी करणा-या पाणलोट योद्ध्यांना यावेळी
गौरविण्यात आले. यावेळी वृक्षारोपण आणि मृद व जलसंधारणाची शपथही घेण्यात आली. पथनाट्य
पथकाद्वारे माती, पाण्याचे महत्व विशद करण्यात आले. जिल्हा जलसंधारण अधिकारी अमोल मस्कर, सचिनकुमार वानरे, राजेश गिरी, राम ठोके, श्री. वनारे यांच्यासह ग्रामसेवक, गावातील नागरिक, महिला बचत
गटाचे पदाधिकारी उपस्थित होते.
दि. 24 रोजी
पातूर तालुक्यातील जांब व पिंपळडोळी, 25 रोजी अकोला तालुक्यातील बोरगाव मंजू व सोनाळा,
26 रोजी बार्शीटाकळी तालुक्यातील घोटा व पाराभवानी, 27 रोजी मुर्तीजापुर तालुक्यातील
चिखली व कादवी, 28 रोजी तेल्हारा तालुक्यातील चितळवाडी व खंडाळा येथे पाणलोट यात्रा
आयोजित करण्यात आली आहे.
000
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा