अल्पसंख्याक उमेदवारांना प्रशिक्षणासाठी इच्छूक संस्थांनी अर्ज करावेत नियोजन कार्यालयाचे आवाहन

 

अल्पसंख्याक उमेदवारांना प्रशिक्षणासाठी इच्छूक संस्थांनी अर्ज करावेत

नियोजन कार्यालयाचे आवाहन

अकोला, दि. २७ : अल्पसंख्याक समुदायातील उमेदवारांना समान संधी, शासकीय सेवेत, तसेच पोलीस दलात निवड होण्याच्या अनुषंगाने प्रशिक्षण देण्यात येणार आहे. उमेदवारांना निवासी पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण योजनेत प्रशिक्षण देऊ इच्छिणा-या संस्थांनी जिल्हा नियोजन अधिका-यांकडे तत्काळ अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

किमान २५ ते कमाल ५० प्रशिक्षणार्थींना निवासी पोलीस शिपाई भरतीपूर्व परीक्षेसाठी प्रशिक्षण देण्याची सुविधा संस्थेकडे असावी. विद्यार्थ्यांकडून गणित, सामान्यज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी, मराठी भाषा यासह शारिरीक चाचणीसाठी सराव करून घेणे अपेक्षित आहे. त्यासाठी अनुभवी प्रशिक्षक असावेत.

ग्रंथालय, वाचनालय, स्वच्छतागृहे, ५० प्रशिक्षणार्थींसाठी निवास खोल्या, मैदान, महिला उमेदवारांसाठी स्वतंत्र- सुरक्षित व्यवस्था आदी बाबी असणे आवश्यक आहे. ५० प्रशिक्षणार्थींसाठी निवास, अभ्यास साहित्य, प्रशिक्षण, अल्पोपहार, भोजन आदींसाठी १२ लक्ष २ हजार ५०० रू. अनुदान अनुज्ञेय आहे. त्यानंतर २५ टक्के अनुदान दोन महिने प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर व उर्वरित २५ टक्के अनुदान प्रशिक्षित उमेदवार प्रत्यक्षात पोलीस भरतीच्या चाचणीस उपस्थित असल्याचा पुरावा सादर केल्यानंतर जिल्हाधिका-यांमार्फत प्रशिक्षण संस्थांना अदा करण्यात येतील.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूकीसाठी 70 उमेदवारांचे अर्ज कायम