कापूस व सोयाबीन उत्पादक शेतक-यांना अर्थसहाय्य आधार संमती सादर करण्याची मुदत २८ फेब्रुवारीपर्यंत
कापूस व सोयाबीन उत्पादक शेतक-यांना अर्थसहाय्य
आधार संमती सादर करण्याची मुदत २८
फेब्रुवारीपर्यंत
अकोला, दि. २४ : सन 2023 खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना २ हेक्टर
मर्यादेत प्रति हे. ५ हजार रू. मदत देण्यात येत आहे. पात्र शेतक-यांनी आधार
संमतीसह नाहरकत प्रमाणपत्र २८ फेब्रुवारीपूर्वी कृषी सहायकाकडे सादर करण्याचे
आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे यांनी केले.
खरीप २०२३ मध्ये ई-पीक पाहणी
केलेले कापूस, सोयाबीन उत्पादक शेतकरी, ज्या शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी पोर्टलवर नोंद केली नाही तथापि, सातबारा उताऱ्यावर पीकाची नोंद आहे असे
खातेदार, खरीप २०२३ कापूस, सोयाबीन उत्पादक वैयक्तिक व सामाईक खातेदार पात्र
आहेत. पात्र शेतक-यांनी ई-पीक पाहणी पोर्टलवरील यादीत आपले नाव असल्याबाबत खातरजमा
www.scagridbt.mahait.org
या पोर्टलवर किंवा संबधित कृषी सहाय्यक यांच्याकडून
करुन घ्यावी, तसेच ज्या शेतकऱ्यांनी खरीप २०२३ मध्ये ई- पीक पाहणी पोर्टलवर नोंद केली नाही तथापि,
सातबा-यावर नोंद आहे अशा
शेतकऱ्यांनी गावातील तलाठी यांच्याशी संपर्क
साधावा. वनपट्टेधारक
खातेदार असतील तर त्यांनी तहसील, जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.
अर्थसहाय्य योजनेचा लाभ घेण्यासाठी वैयक्तिक खातेदारांना आपले आधार संमती व सामाईक खातेदारांना आधार
संमतीसह नाहरकत प्रमाणपत्र २८ फेब्रुवारीपर्यंत संबधित कृषी सहाय्यक यांचेकडे सादर
करणे आवश्यक आहे. त्याचे नमुने कृषी सहायकांकडे उपलब्ध आहेत.
०००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा