प्रत्येक पोस्ट ऑफिसमध्ये सामाईक सेवा केंद्र

 प्रत्येक पोस्ट ऑफिसमध्ये सामाईक सेवा केंद्र

अकोला, दि. ७ : भारतीय टपाल विभागातर्फे अकोला आणि वाशिम जिल्ह्यातील सर्व टपाल कार्यालयांत कॉमन सर्विस सेंटरची (सीएससी सेंटर) सुविधा उपलब्ध आहे. नागरिकांनी त्याचा लाभ घेण्याचे आवाहन प्रवर डाक अधिक्षक रामी रेड्डी यांनी केले आहे.

 या केंद्रात विविध वीज, टेलिफोन बिल, मोबाइल रीचार्ज, डीटीएच रीचार्ज, नवीन पॅन कार्डची नोंदणी आणि पॅन कार्डसाठी अर्ज करण्याची सुविधा आहे. त्याचप्रमाणे, विम्याचे हप्ते (एलआयसी आदी), विविध शासकीय योजनांसाठी अर्जही करता येतात. नागरिकांनी आपल्या घराजवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन लाभ घेण्याचे आवाहन श्री. रेड्डी यांनी केले.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा