माजी आमदार तुकाराम बिडकर यांच्या निधनाने मार्गदर्शक हरपला - पालकमंत्री आकाश फुंडकर यांच्याकडून श्रद्धांजली





माजी आमदार तुकाराम बिडकर यांच्या निधनाने मार्गदर्शक हरपला

-        पालकमंत्री आकाश फुंडकर यांच्याकडून श्रद्धांजली

अकोला, दि. १४ : विदर्भ वैधानिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष तथा मुर्तिजापूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार तुकाराम बिडकर यांच्या निधनामुळे एक लोकनेते व विदर्भातील सक्षम नेतृत्व हरपले आहे. त्यांच्या जाण्याने आपण मार्गदर्शक गमावल्याची भावना राज्याचे कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री आकाश फुंडकर यांनी व्यक्त केली.

माजी आमदार स्व. बिडकर यांच्यावर आज कुंभारी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी पालकमंत्री श्री. फुंडकर यांनी उपस्थित राहून श्रद्धांजली वाहिली, तसेच त्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले. माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, खासदार अमर काळे, आमदार रणधीर सावरकर, आमदार अमोल मिटकरी, आमदार वसंत खंडेलवाल, माजी राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील, गुलाबराव गावंडे यांच्यासह अनेक मान्यवरांनी यावेळी उपस्थित राहून श्रद्धांजली अर्पण केली.

माजी आमदार स्व. बिरकड यांच्याशी आपले अनेक वर्षांपासून कौटुंबिक स्नेह व जिव्हाळ्याचे संबंध होते. स्व. भाऊसाहेब फुंडकर यांच्याशी त्यांचे सख्य होते. मी मंत्री झाल्यानंतर त्यांनी आवर्जून भेट देऊन शुभेच्छा दिल्या होत्या व त्यांच्याशी नेहमी संवाद होत असे. अनेक विषयांत त्यांच्याकडून मार्गदर्शन मिळे. त्यांच्या रूपाने मार्गदर्शक हरपल्याची भावना पालकमंत्री श्री. फुंडकर यांनी व्यक्त केली.

०००


 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूकीसाठी 70 उमेदवारांचे अर्ज कायम