खेडोपाडी बचत गटांचे जाळे विणणा-या ‘माविम’चा सुवर्णमहोत्सव


खेडोपाडी बचत गटांचे जाळे विणणा-या ‘माविम’चा सुवर्णमहोत्सव

 

अकोला, दि. २४ : महिला आर्थिक विकास महामंडळाची स्थापना आंतरराष्ट्रीय महिला वर्षानिमित्त १९७५ मध्ये करण्यात आली. खेडोपाडी बचत गटांचे जाळे विणणा-या ‘माविम’च्या स्थापनेला ५० वर्षे पूर्ण झाली असून, जिल्ह्यात ४५ हजारहून अधिक भगिनी बचत गटांशी जोडल्या गेल्या आहेत.

 

महिलांच्या सर्वांगीण विकासाचे महत्व व महामंडळाची या कामातील वाटचाल लक्षात घेऊन शासनाने २० जानेवारी २००३ रोजी महामंडळाला महिला विकासाची राज्यस्तरीय शिखर संस्था म्हणून घोषित केले आहे. महामंडळातर्फे जिल्ह्या२९१ गावात गाव विकास समितीची स्थापना करण्यात आली असून, हजार ४२० महिला बचत गटांची निर्मिती करण्यात आली आहे . त्यात हजार ३४९ ग्रामीण हजार ७१ शहरी गट आहेत, अशी माहिती महामंडळाच्या जिल्हा समन्वय अधिकारी वर्षा खोब्रागडे यांनी दिली.

 

खेड्यापाड्यातील २५ हजार ११ व शहरांतील २१ हजार ४३९ गरीबगरजू महिला बचत गटांशी जोडल्या गेल्या आहेत. गरीब, गरजू, घटस्फोटित, परितक्त्या , विधवा, वंचित महिलांना गटांमुळे आधार मिळाला आहे. जिल्ह्यात नऊ लोकसंचालित साधन केंद्रे आहेत. त्याद्वारे ४६ हजार ४५० महिलांचे संघटन झाले आहे. त्याची एकूण बचत ४६ कोटी ३८ लक्ष रु. आहे.

 

बचत गटांना आतापर्यंत बँकेद्वारे २४३ कोटी ५८ लक्ष रु. पुरवठा करण्यात आला आहे.सन २०२४-२०२५ मध्ये १ हजार २२५ गटांना ३९ कोटी २० कोटी रुपये कर्ज मिळाले आहे . त्यात शेतीआधारित व्यवसाय करणाऱ्या २० हजार ३१९ आणि बिगर शेती आधारित व्यवसाय करणाऱ्या ४ हजार ४६० महिला आहेत. मानव विकास कार्यक्रमात पातूर तालुक्यात नवतेजस्विनी तयार कपडे प्रशिक्षण केंद्र सुरू असून, १६ बचत गटांना  ई-रिक्षासाठी मदत करण्यात आली आहे.

 त्याचप्रमाणे, हजार २२७ महिलांना व्यवसायासाठी कोटी ६१ लक्ष रु.  व तेजश्री मानव विकास मिशन कार्यक्रमात हजार ३११ महिलांना १ कोटी ३१ कोटी रु.  देण्यात आले आहे. लोकसंचालित साधन केंद्रातर्फे स्वबळावर सुसज्ज दोनमजली इमारतही अकोल्यात निर्माण करण्यात आली आहे.

शेळीपालन, कुक्कुटपालन, दुग्धव्यवसाय, शेती पूरक व्यवसाय , किराणा, विविध वस्तू भांडार आदी व्यवसाय करण्यास गरजू महिलांना सहाय्य करून त्यांच्या सक्षमीकरणाचे कार्य होत आहे.

चौकट

वर्धापनदिनानिमित्त ‘माविम’तर्फे मलकापूर रस्त्यावरील लोभाजी आप्पाभवन येथे उद्या दि. २५ फेब्रुवारी रोजी दु. १२ वा. मान्यवरांच्या उपस्थितीत सुवर्णमहोत्सवी सोहळा आयोजिण्यात आला आहे, असे श्रीमती खोब्रागडे यांनी सांगितले.

०००

 

 

 

 

 

 

 

 

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूकीसाठी 70 उमेदवारांचे अर्ज कायम