राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे जिया खान यांचा दौरा
राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष
प्यारे जिया खान यांचा दौरा
अकोला, दि. 10 : राज्य अल्पसंख्याक
आयोगाचे अध्यक्ष (मंत्री दर्जा) प्यारे जिया खान हे दि. 11 फेब्रुवारी रोजी अकोला जिल्ह्याच्या
दौऱ्यावर येत आहेत.
दौ-यानुसार, मंगळवार, दि.11 फेब्रुवारी
रोजी सकाळी 10 वाजता शासकीय विश्रामगृह, अकोला येथे आगमन. सकाळी 10.30 वाजता अकोला
येथून वाडेगावकडे प्रयाण. सकाळी 11 वाजता वाडेगाव येथील अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थांना
भेट. दुपारी 12 वाजता पातूर येथील अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थांना भेट. दुपारी
2.30 वाजता पारस येथील अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थांना भेट. दुपारी 4.30 वाजता अकोला
येथून नागपूरसाठी प्रयाण.
०००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा