पारधी व फासेपारधी समाजाच्या गरजूंना अर्थसाह्य

 

पारधी व फासेपारधी समाजाच्या गरजूंना अर्थसाह्य

अकोला, दि. २८ : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पातर्फे पारधी व फासेपारधी समाजाच्या गरजू व्यक्तींनी विविध योजनांच्या लाभासाठी दि. १० मार्चपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

योजनेत पारधी समाजाच्या दारिद्र्यरेषेखालील व्यक्तींना १०० टक्के अनुदानावर शेळीपालनासाठी ५ शेळ्या व १ बोकड खरेदी करण्यासाठी अर्थसाह्य दिले जाते. त्याचप्रमाणे, कुकरीज (डीनर सेट) व्यवसायासाठीही १०० टक्के अनुदान मिळते.

योजनेचा अर्ज आदिवासी विकास प्रकल्पाच्या कार्यालयात विनामूल्य उपलब्ध आहे. अर्जासोबत पारधी, फासेपारधी जमातीचा दाखला प्रमाणपत्र, आधारपत्र, बँक खाते क्रमांक व आयएफएससी कोड, दारिद्र्यरेषेचे कार्ड किंवा तहसीलदारांचा उत्पन्नाचा दाखला, रहिवाशी दाखला, शिधापत्रिका, पासपोर्ट आकारातील छायाचित्रे, दिव्यांग असल्यास तसे प्रमाणपत्र, परितक्त्या, विधवा असल्यास तसे प्रमाणपत्र आदी कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूकीसाठी 70 उमेदवारांचे अर्ज कायम