जिल्ह्यातील लघुसिंचन योजना व जलसाठ्यांची गणना करणार


 जिल्ह्यातील लघुसिंचन योजना व जलसाठ्यांची गणना करणार

 

अकोला, दि.  १२ : जिल्ह्यातील जलसाठे व लघु सिंचन योजनांची गणना करण्यासाठी जलसंधारण कार्यालयाकडून कार्यक्रम हाती घेण्यात आला असून, तालुकास्तरीय बैठका घेण्यात येत आहेत.

मृद व जलसंधारण विभागामार्फत लघु सिंचन योजनांची सातवी व जलसाठ्यांची दुसरी प्रगणना सुरू होत आहे. त्या अनुषंगाने अकोला तालुकास्तरीय बैठक तहसीलदार सुरेश कव्हळे यांच्या अध्यक्षतेत आज झाली. उपविभागीय जलसंधारण अधिकारी सचिनकुमार वानरे, श्रीमती आर. व्ही. गिरीपुंजे, श्रीमती पी. एस. पंडे, सहायक महसूल अधिकारी श्रीमती पी. एस. पंडे आदी उपस्थित होते.

लघुसिंचन प्रकल्प व जलसाठ्यांच्या प्रगणनेसाठी जलसंपदा, मृद व जलसंधारण, कृषी, जि. प. लघुसिंचन, तसेच ग्रामस्तरावरील अधिकारी व कर्मचारी यांचे सहकार्य मिळवून कामाला वेग देण्याचे निर्देश श्री. कव्हळे यांनी दिले.

प्रगणनेत दोन हजार हेक्टरपर्यंत क्षेत्र क्षमता असलेल्या लघुसिंचन योजना, छोटी धरणे, भूपृष्ठाखालील जलसाठ्याच्या वापरासाठीच्या योजना साध्या विहीरी, कूपनलिका, कालवे, बंधारे, विमोचक, बंद नलिका वितरण प्रणाली, उपसा सिंचन आदी सर्व बाबींचा समावेश आहे, अशी माहिती श्री. वानरे यांनी दिली.

 ०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूकीसाठी 70 उमेदवारांचे अर्ज कायम