गावांच्या समृद्धीसाठी जलसंवर्धन आवश्यक - एसडीओ अनिरूद्ध बक्षी



गावांच्या समृद्धीसाठी जलसंवर्धन आवश्यक

-        एसडीओ अनिरूद्ध बक्षी

अकोला, दि. २५ : जलसंवर्धनातूनच सिंचन व कृषी उत्पादकता वाढेल. खेडीपाडी समृद्ध होतील. त्यामुळे गावोगाव पाणलोट व्यवस्थापन व्हावे, असे आवाहन बाळापूरचे उपविभागीय अधिकारी अनिरूद्ध बक्षी यांनी केले.

 

श्री. बक्षी यांच्या हस्ते पाणलोट यात्रेचे पातूर तालुक्यातील पिंपरडोळी येथे सोमवारी स्वागत करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. सरपंच गंगासागर ताजने, अनिलबाबा देशमुख, नायब तहसीलदार श्री. तेलगोटे, राम ठोके, श्री. वानरे, बी. आर. इंगळे आदी उपस्थित होते.

प्रारंभी जि. प. शाळेच्या विद्यार्थ्यांच्या सहभागातून प्रभातफेरी काढण्यात आली. यानिमित्त निबंध व चित्रकला स्पर्धेतील गुणवंतांना बक्षीसवितरण झाले. रूक्मिणी स्वयंसहायता गट, वैष्णवी स्वयंसहायता गट, संघर्ष स्वयंसहायता गट यांचे स्टॉलही यात्रेनिमित्त लावण्यात आले. पथनाट्याद्वारे जनजागृती, वृक्षारोपण करण्यात आले. पाणलोट योद्ध्यांचा सत्कारही यावेळी झाला.

०००


 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूकीसाठी 70 उमेदवारांचे अर्ज कायम