ऑनलाईन सुरक्षिततेसाठी सजगतेची गरज - जिल्हा माहितीविज्ञान अधिकारी अनिल चिंचोले यांचा विशेष लेख

विशेष लेख

इंटरनेट सुरक्षितता दिवसानिमित्त जिल्हा माहितीविज्ञान अधिकारी अनिल चिंचोले यांचा विशेष लेख

 

ऑनलाईन सुरक्षिततेसाठी सजगतेची गरज

शासकीय कामात सायबर सुरक्षेचे वाढते महत्त्व लक्षात घेऊन राष्ट्रीय सूचनाविज्ञान केंद्रामार्फत (एनआयसी) ‘सेक्युअर युवर अकाऊंटस्’ ही विशेष मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेअंतर्गत सर्व सरकारी कार्यालये, बँका, खाजगी संस्थांसह नागरिकांनाही ऑनलाईन खात्यांच्या सुरक्षिततेबाबत जागरूक करण्याचे उद्दिष्ट आहे.

यानिमित्त सर्व नागरिकांनी, इंटरनेटचा वापर करणा-या प्रत्येकाने सायबर सुरक्षेसाठी महत्त्वाच्या टिप्स जाणून घेणे व त्यांचा अंगीकार करणे आवश्यक आहे.

 इंटरनेट सुरक्षेसाठी महत्त्वाच्या टिप्स:

विश्वसनीय संकेतस्थळेच वापरा कुठलाही दुवा (link) उघडण्याआधी तो अधिकृत आहे का, हे तपासा. एचटीटीपीएस असलेली वेबसाइट वापरा – युआरएलच्या सुरुवातीस https:// असल्याची खात्री करा. वाय-फाय सुरक्षा जपा सार्वजनिक वायफाय वापरताना व्हीपीएन सेवा वापरा. सतत सॉफ्टवेअर अपडेट करा मोबाईल, लॅपटॉप व अँटीव्हायरस अपडेट ठेवा.

 पासवर्ड सुरक्षेसाठी टिप्स:

मजबूत पासवर्ड ठेवा किमान १२ अक्षरे, मोठी-लहान अक्षरे, विशेष चिन्हे (@, #, &) आणि अंक असलेला पासवर्ड निवडा. सर्व खात्यांसाठी वेगळे पासवर्ड वापरा एकच पासवर्ड सर्वत्र वापरू नका. पासवर्ड दर ३-६ महिन्यांनी बदला.  द्विस्तरीय प्रमाणीकरण (Two-Factor Authentication) अनिवार्य करा – ओटीपी किंवा अॅप आधारित प्रमाणीकरण सक्रिय ठेवा.

 बँक खात्यांची सुरक्षितता:

कोणालाही ओटीपी, पिन, सीव्हीव्ही शेअर करू नका. फिशिंग ईमेल व बनावट कॉलपासून सावध रहा. बँकेच्या अधिकृत अ‍ॅपद्वारेच व्यवहार करा, थर्ड-पार्टी अ‍ॅप टाळा. मोबाईल वॉलेट आणि नेट बँकिंगसाठी मजबूत पासवर्ड ठेवा.

 युपीआय पेमेंट सुरक्षिततेसाठी टिप्स:

कोणत्याही अनोळखी व्यक्तीकडून आलेले युपीआय पेमेंट रिक्वेस्ट स्वीकारू नका. युपीआय पिन केवळ पैसे पाठवण्यासाठी असतो, प्राप्त करण्यासाठी नाही. फसवणुकीच्या कॉल्सना प्रतिसाद देऊ नका. गुगल पे, फोन पे, पेटीएम इत्यादी अ‍ॅप्सवर सुरक्षा सेटिंग सक्रिय ठेवा.

 सोशल मीडिया खात्यांची सुरक्षितता:

खाजगी माहिती सार्वजनिक करू नका. स्ट्रॉंग पासवर्ड ठेवा आणि द्विस्तरीय प्रमाणीकरण सुरू करा. फसवे ऑफर आणि लिंक टाळा. फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर इत्यादींवर लॉगिन अलर्ट सुरू ठेवा. सुरक्षित, विश्वासार्ह आणि सुरक्षित सायबर स्पेससाठी मानवी संसाधनांच्या विकासासाठी लक्ष्यित दृष्टिकोनासह इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय माहिती सुरक्षा शिक्षण आणि जागरूकता (Information Security Education and Awareness - ISEA) प्रकल्प टप्पा-III राबवत आहे. या प्रकल्पात सायबर स्वच्छता आणि सायबर सुरक्षेबद्दल (सायबर अवेअर डिजिटल नागरिक) जनजागृती निर्माण करण्याचा एक घटक समाविष्ट आहे जो प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष पद्धतीने विविध जागरूकता उपक्रमांद्वारे शालेय मुले आणि शिक्षक, महाविद्यालयीन विद्यार्थी आणि प्राध्यापक, महिला, विशेष दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिक, सरकारी कर्मचारी इत्यादींना लक्ष्य करतो.

सर्व नागरिकांनी व शासकीय कर्मचाऱ्यांनी सजग होऊन ऑनलाईन सुरक्षितता वाढवूया.

-        अनिल चिंचोले,

जिल्हा माहितीविज्ञान अधिकारी,

राष्ट्रीय माहितीविज्ञान केंद्र,

अकोला

 

 

  

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूकीसाठी 70 उमेदवारांचे अर्ज कायम