सामाजिक न्याय विभागाच्या पुरस्कारांसाठी अर्ज करण्याचे आवाहन

सामाजिक न्याय विभागाच्या 

पुरस्कारांसाठी अर्ज करण्याचे आवाहन

अकोला, दि.  5 : समाजिक न्याय विभागामार्फत समाज कल्याण क्षेत्रामध्ये वैशिष्ट्यपूर्ण काम करणा-या व्यक्ती व स्वयंसेवी संस्थांना प्रोत्साहन मिळावे म्हणून डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार, पद्यश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड पुरस्कार, संत रविदास पुरस्कार, शाहु,फुले,आंबेडकर पुरस्कार व डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय प्राविण्य पुरस्कार आदी पुरस्कार देऊन व्यक्ती व संस्थांना सन्मानपूर्वक गौरविण्यात येते. त्यानुसार 2023-24 या वर्षातील पुरस्कारांसाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

अर्ज दाखल करताना चारित्र्य पडताळणी (पोलीस विभागाचा) अहवाल सादर करणे क्रमप्राप्त राहील. सदर परिपुर्ण पुरस्कार प्रस्ताव चार प्रतींमध्ये दि. 15 फेब्रुवारीपर्यंत सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण, पत्ता-डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन,निमवाडी,दक्षतानगर, पोलीस वसाहतजवळ,अकोला येथे सादर करावेत. मुदतबाह्य प्रस्ताव स्वीकारले जाणार नाहीत, असे आवाहन सहाय्यक  आयुक्त डॉ.अनिता राठोड यांनी केले आहे.

                         ००० 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूकीसाठी 70 उमेदवारांचे अर्ज कायम