पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर यांच्याकडून राज्यपालांचे स्वागत

 







अकोला, दि. 5 : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या ३९ वा दीक्षांत समारंभानिमित्त राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे अकोला येथे आगमन झाले. त्यांचे स्वागत राज्याचे कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर यांनी केले.
विद्यापीठाचे प्रतिकुलपती तथा राज्याचे कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे हे उपस्थित होते. त्यांचेही स्वागत पालकमंत्र्यांनी केले. यावेळी पालकमंत्र्यांनी राज्यपाल महोदयांना जिल्ह्यातील विविध बाबींविषयी माहिती दिली. जिल्हाधिकारी अजित कुंभार, कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. गडाख, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी बी. वैष्णवी, पोलीस अधिक्षक बच्चन सिंह आदी उपस्थित होते.
०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूकीसाठी 70 उमेदवारांचे अर्ज कायम