‘अकोला जिल्हा ग्रंथोत्सवा’चा गुरूवारी शुभारंभ
‘अकोला जिल्हा ग्रंथोत्सवा’चा
गुरूवारी शुभारंभ
अकोला, दि. १० : जिल्ह्याच्या सांस्कृतिक
क्षेत्रात महत्वपूर्ण ठरलेल्या ‘अकोला जिल्हा ग्रंथोत्सवा’चा शुभारंभ गुरूवारी (१३
फेब्रुवारी) होणार आहे. ग्रंथदिंडी, परिसंवाद, चर्चासत्र, व्याख्यान, कवीसंमेलन, गीतगायन
अशी कार्यक्रमांची रेलचेल असलेला हा ग्रंथोत्सव रसिकांसाठी मेजवानी ठरणार आहे.
जिल्हा ग्रंथालयाच्या प्रांगणात गुरूवारी
सकाळी १० वा. ग्रंथदिंडी व ग्रंथपूजनाने ग्रंथोत्सवाचा प्रारंभ होईल. प्रमिलाताई ओक
ग्रंथालयापासून जिल्हा ग्रंथालयापर्यंत ग्रंथदिडी काढण्यात येईल. सकाळी ११ वा. ग्रंथालयात
मुख्य कार्यक्रम होईल. कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री आकाश फुंडकर यांच्या
हस्ते उद्घाटन होईल. राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे सदस्य पुष्पराज गावंडे अध्यक्षस्थानी
असतील. विविध मान्यवर उपस्थित राहतील.
शुभारंभाच्या पहिल्या दिवशी ‘छत्रपती
शिवाजी महाराज यांचे चरित्र काल, आज आणि उद्या’ या विषयावर अक्षय राऊत यांचे व्याख्यान,
‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा- सार्वजनिक ग्रंथालयांचे योगदान’ या विषयावर परिसंवाद होणार
आहे.
ग्रंथोत्सवाच्या दुस-या दिवशी (१४
फेब्रुवारी) सकाळी १०.३० वा. कलावंत आचल सदार सदाबहार गीते सादर करतील. त्यानंतर ‘पाल्यांना
वाचनाकडे वळविण्यासाठी पालकाची भूमिका’ या विषयावर चर्चासत्र, तसेच ‘स्मृतीच्या मशाली
अनामिक स्वातंत्र्य संग्राम सेनानींचे क्रांत दर्शन’ हा कार्यक्रम सादर होईल. त्यानंतर
हास्य कवीसंमेलन व दुपारी ४.३० वा. समारोप समारंभ होणार आहे.
०००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा