चिखली व कादवी गावात पाणलोट यात्रेचे स्वागत आमदार हरिश पिंपळे यांची उपस्थिती
चिखली व कादवी गावात पाणलोट यात्रेचे स्वागत
आमदार हरिश पिंपळे यांची उपस्थिती
अकोला, दि. २८ : मृद व जलसंधारण विभागातर्फे मूर्तिजापूर तालुक्यातील चिखली व कादवी गावात पाणलोट यात्रेचे गुरूवारी उत्साहात स्वागत झाले.
आमदार हरिश पिंपळे यांच्या हस्ते चिखली येथे पाणलोट रथाचे पूजन व हिरवी झेंडी दाखवून यात्रेला प्रारंभ झाला. जिल्हा जलसंधारण अधिकारी अमोल मस्कर, उपविभागीय जलसंधारण अधिकारी सचिन वानरे, मंगेश काळे, सरपंच किशोर राऊत, व्ही. बी. मडावी, राजेश गोरे, वर्षा पुंड आदी उपस्थित होते.
गावे जलसमृद्ध होण्यासाठी जलसंधारण आवश्यक आहे. त्यामुळे अधिकाधिक नागरिकांनी या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन आमदार श्री. पिंपळे यांनी केले.
यात्रेनिमित्त आयोजित निबंध व चित्रकला स्पर्धेचे बक्षीसवितरण, तसेच पाणलोट योद्धा व धरिणीताई यांचा गौरव मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
सानेगुरूजी कला व सांस्कृतिक बहु. मंडळाचे विशाल राखोंडे, सुखदेव उपर्वट, प्रकाश इंगोले, सिद्धार्थ इंगळे, गजानन आवटे, कैलास शिरसाठ, गणेश देवकर, प्रज्ज्वल भाजीपाले, रवी कढोणे यांनी वासुदेव व गोंधळी वेशभूषेत लोककला सादर केली. मृद व जलसंवर्धनाची शपथही यावेळी घेण्यात आली.
०००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा