दहावी- बारावीची परीक्षा : कॉपीमुक्त अभियान राबविणार भरारी पथकांनी सजग राहण्याचे निर्देश
दहावी- बारावीची परीक्षा : कॉपीमुक्त अभियान राबविणार
भरारी पथकांनी सजग राहण्याचे निर्देश
अकोला, दि. ७ : दहावी व बारावीच्या परीक्षेत कुठेही गैरप्रकार घडू नयेत
यासाठी कॉपीमुक्त अभियान राबविण्याचे, तसेच भरारी पथकांनी सजग राहण्याचे निर्देश जिल्हाधिकारी
अजित कुंभार यांनी येथे दिले.
परीक्षेच्या अनुषंगाने जिल्हाधिका-यांनी यंत्रणेचा गुरूवारी बैठकीद्वारे
आढावा घेतला. माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. सुचिता पाटेकर उपस्थित होत्या.
परीक्षेच्या महत्वाच्या पेपरच्या दिवशी तीन सदस्यीय केंद्रस्तरीय निरीक्षण
(बैठे) पथक नेमावे. त्यात एका महिला सदस्याचा समावेश असावा. केंद्रांवर क्रीडांगण,
व्हरांडा, वर्गखोली असे किमान तीन सीसीटीव्ही कॅमेरे असावेत. परीक्षेची व्यापक प्रसिद्धी
करावी, असे निर्देश बैठकीत देण्यात आले.
इयत्ता बारावीची परीक्षा दि. ११ फेब्रुवारीपासून, दहावीची दि. २१ फेब्रुवारीपासून
होत आहे. जिल्ह्यातील ८८ केंद्रांवर २५ हजार ५६९ विद्यार्थी बारावीची आणि ११९ केंद्रांवर २५ हजार ८५७ विद्यार्थी दहावीची परीक्षा
देणार आहेत, अशी माहिती डॉ. पाटेकर यांनी दिली.
०००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा