संत्रावर्गीय फळपीकांच्या नुकसानभरपाईबद्दल १० कोटी ९० लक्ष ६२ हजार निधी मंजूर

 

संत्रावर्गीय फळपीकांच्या नुकसानभरपाईबद्दल १० कोटी ९० लक्ष ६२ हजार निधी मंजूर

शेतक-यांना तातडीने मदत मिळण्यासाठी गतीने प्रक्रिया राबवा

-        जिल्हाधिकारी अजित कुंभार

अकोला, दि. ३ : जिल्ह्यात खरीप २०२४ मध्ये ढगाळ वातावरण व सततच्या पावसाने झालेल्या संत्रावर्गीय फळपीकांच्या नुकसानीबाबत एकूण १० कोटी ९० लक्ष ६२ हजार एवढी आर्थिक मदत वितरित करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. त्याची कार्यवाही तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी तहसीलदारांना दिले आहेत.

जिल्ह्यात जुलै ते ऑगस्ट २०२४ दरम्यान ढगाळ वातावरण व सततच्या पावसामुळे अकोट, मूर्तिजापूर, तेल्हारा तालुक्यातील ३ हजार २९ हे. क्षेत्रावरील संत्रावर्गीय पीकांचे फळगळीने नुकसान झाले. त्याबद्दल या तीन तालुक्यातील १३० गावांतील ३ हजार ४३३ शेतक-यांना भरपाईपोटी १० कोटी ९० लक्ष ६२ हजार रू. निधी वितरित करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे.

अकोट तालुक्यातील ८६ गावांतील २ हजार ४९३ शेतक-यांना ८ कोटी ७ लाख ८४ हजार रू., तेल्हारा तालुक्यातील ३२ गावांतील ८९५ शेतक-यांना २ कोटी ७५ लाख ७६ हजार रू., मूर्तिजापूर तालुक्यात १० गावांतील २१ शेतक-यांना ७० हजार २०० रू. इतकी मदत वितरणास मंजुरी मिळाली आहे.

संबंधित शेतकरी बांधवांना मदत तातडीने मिळवून द्यावी. फळपीकांच्या नुकसानीच्या अनुषंगाने बाधित शेतक-यांच्या याद्या ई-पंचनामा पोर्टल १०० अपलोड करण्याची दक्षता घ्यावी.  ई-केवायसीची पूर्तता करून घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिका-यांनी दिले आहेत.

०००

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूकीसाठी 70 उमेदवारांचे अर्ज कायम