थेट कर्ज योजनेसाठी अर्ज करा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाचे आवाहन
थेट कर्ज योजनेसाठी अर्ज करा
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाचे आवाहनअकोला, दि. १८ : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाकडून मातंग समाज व तत्सम १२ पोटजातीतील कुटुंबांच्या प्रगतीसाठी थेट कर्ज योजना राबविण्यात येते. दि. २० मार्चपूर्वी अर्ज करून त्याचा लाभ घेण्याचे आवाहन महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक आनंद वाडिवे यांनी केले आहे.
थेट कर्ज योजनेत १८ ते ५० वयोगटातील व्यक्तींना १ लक्ष रू. मर्यादेपर्यंत कर्ज दिले जाते. जात प्रमाणपत्र, शिधापत्रिका, उत्पन्नाचा दाखला, आधारपत्र, पॅनकार्ड, उद्योग प्रमाणपत्र आवश्यक आहे. उत्पन्न तीन लाखांहून कमी असावे. महामंडळाच्या योजनेचा यापूर्वी लाभ घेतलेला नसावा.
महामंडळाचा पत्ता : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, तुषार शिरसाठ यांचे घर, नालंदानगर, गांधीनगर टपाल कार्यालयाजवळ, कौलखेड रस्ता, अकोला. संपर्क : ७७६७८२०२५९.
मातंग व तत्सम १२ पोटजातीतील कुटुंबाची सामाजिक व आर्थिक उन्नती, तसेच रोजगार व स्वयंरोजगाराची साधने उपलब्ध व्हावीत यासाठी महामंडळाकडून सुविधा कर्ज योजना, महिला समृद्ध योजना, शैक्षणिक कर्ज योजना, थेट कर्ज योजना, लघु ऋण वित्त योजना आदी अनेक योजना राबविल्या जातात. त्याचा लाभ समाजबांधवांनी घ्यावा, असे आवाहन श्री. वाडिवे यांनी केले.
०००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा