आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष; जिल्ह्यात वर्षभर विविध उपक्रम राबविणार उपक्रमांत सर्वांचा सहभाग मिळवा : जिल्हाधिकारी अजित कुंभार
आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष; जिल्ह्यात वर्षभर विविध उपक्रम
राबविणार
उपक्रमांत सर्वांचा सहभाग मिळवा : जिल्हाधिकारी अजित कुंभार
अकोला, दि. १७ : आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त जिल्हा उपनिबंधक
कार्यालयाच्या पुढाकाराने व सर्व सहकारी संस्थांच्या सहकार्याने वर्षभर विविध उपक्रम
घेण्यात येत आहेत. या उपक्रमांमध्ये सहकार क्षेत्रातील संस्थांप्रमाणेच विविध क्षेत्रातील
संस्था व नागरिकांचा सहभाग मिळवून व्यापक आयोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अजित
कुंभार यांनी आज येथे दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा सहकार विकास समितीच्या बैठकीत ते बोलत
होते. जिल्हा उपनिबंधक प्रवीण लोखंडे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे व समितीचे
सदस्य अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. कुंभार म्हणाले की, वर्षभर आयोजित करण्यात येणा-या
उपक्रमांत वैविध्य व अधिकाधिक संस्था, व्यक्तींचा सहभाग मिळवावा. जिल्ह्यातील ९३६ सेवा
सहकारी संस्थांची माहिती राष्ट्रीय सहकारी डेटाबेसवर अपलोड करण्यात आली आहे. सहकारी
संस्थांच्या माध्यमातून तालुक्याच्या ठिकाणी गोदाम, सीएससी सेंटर, जनऔषधी केंद्र आदींसाठी
प्रयत्न व्हावेत, असेही निर्देश त्यांनी दिले.
शिवजयंतीला रक्तदान महाशिबिर
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीदिनी (१९ फेब्रुवारी) रक्तदान महाशिबिराचे
आयोजन करण्यात आले आहे. सहकार संकुल येथील जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्या आवारात सकाळी
८ ते सायं. ५ या वेळेत शिबिर होईल. अधिकाधिक नागरिकांनी या उपक्रमात सहभागी व्हावे,
असे आवाहन जिल्हा उपनिबंधक श्री. लोखंडे यांनी केले.
उपक्रमासाठी नागरी सहकारी बँका, पतसंस्था, देखरेख संघ संस्था, सेवा
सहकारी संस्था, जंगल कामगार सहकारी संस्था, सुशिक्षित बेरोजगार संस्था, गृहनिर्माण
सहकारी संस्था, दुग्ध व मत्स्य सहकारी संस्था आदींचे अध्यक्ष, संचालक, सभासद यांचे
उपक्रमासाठी सहकार्य मिळविण्यात येत आहे.
०००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा