डॉ. झाकिर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना अनुदानासाठी इच्छूकांना अर्ज करण्याचे आवाहन
डॉ. झाकिर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना
अनुदानासाठी इच्छूकांना अर्ज करण्याचे आवाहन
अकोला, दि. १४ : ज्या
मदरशांमध्ये फक्त पारंपारिक धार्मिक शिक्षण देण्यात येत आहे आणि ज्यांना
आधुनिक शिक्षणाकरीता शासकिय अनुदान घेण्याची इच्छा आहे अशा मदरशांकडुन अर्ज मागविण्यात येत
आहेत.
सदर मदरसे
चालवणा-या संस्था धर्मदाय आयुक्त अथवा वक्फ बोर्डाकडे नोंदणीकृत असणे आवश्यक
आहे. इच्छुक मदरशांना विज्ञान,
गणित, समाजशास्त्र, हिंदी, मराठी, इंग्रजी व उर्दु हे विषय शिकविण्याकरीता
शिक्षकांना मानधन, पायाभुत सुविधांसाठी व ग्रंथालयासाठी अनुदान,
मदरशांमध्ये राहुन शाळेत शिकणा-या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती.
निवासस्थानात इन्वर्टसची सुविधा,
पेय जलाची व्यवस्था आदी बाबींसाठी अर्ज करता येईल. इच्छुक मदरशांनी अर्ज आवश्यक कागदपत्रे जोडून
जिल्हा नियोजन समिती, नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, अकोला दिनांक २२ फेब्रुवारीपर्यंत प्रस्ताव २ प्रतीत कार्यालयीन
वेळेत सादर करावा.
शासन
निर्णयातील तरतुदीनुसार जास्तीत जास्त ३
डी. एड. /बी. एड. शिक्षकांना मानधन देण्यात येईल. शिक्षणासाठी हिंदी, मराठी, इंग्रजी व उर्दु यापैकी एका माध्यमाची
निवड करुन त्यानुसार शिक्षक नेमणे आवश्यक आहे. ग्रंथालयासाठी
तसेच शैक्षणीक साहित्यासाठी फक्त पहिल्यांदा ५० हजार रू. व तद्नंतर प्रती वर्षी पाच हजार रू. अनुदान
देय आहे. पायाभूत सुविधांसाठी रु. १० लाख अनुदान देय आहे.
पूर्वी ज्या बाबीसाठी लाभ मिळाला असेल तर तो पुन्हा, तसेच केंद्र पुरस्कृत योजनेंतर्गत लाभ मिळाला असेल
मदरशांना योजनेचा लाभ अनुज्ञेय राहणार नाही. विहीत मुदतीनंतर प्राप्त झालेले प्रस्ताव ग्राह्य
धरले जाणार नाहीत. अर्जाचा नमुना व आवश्यक कागदपत्रांची यादी http://mdd.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
०००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा