हृदय रोगाचे लक्षणाकडे दुर्लक्ष करू नका तपासणी करून घ्या - डॉ. बळीराम गाढवे
हृदय रोगाचे लक्षणाकडे दुर्लक्ष करू नका तपासणी करून घ्या
- डॉ. बळीराम गाढवे
अकोला दि. 12 : हृदयरोग हे महाराष्ट्रात होणाऱ्या मृत्यूचे एक प्रमुख कारण आहे. हृदयरोगामुळे होणारे अकाली मृत्यूचे प्रमाण कमी करणे आणि हृदयरोगाची लक्षणे व उपलब्ध निदान उपचार सुविधा याबाबत जनसामान्यांमध्ये जागरूकता निर्माण करणे. या उद्दिष्टाने सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत राज्यात STEMI महाराष्ट्र (एसटी एलीव्हेशन मायो कार्डियल इंन्फेक्शन हृदय विकाराचा एक प्रकार) हा महत्त्वाकांक्षी उपक्रम राबविण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून अकोला जिल्ह्यात बी वैष्णवी मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली डॉ.बळीराम गाढवे, जिल्हा आरोग्य अधिकारी व डॉ. तरंगतुषार वारे जिल्हा शल्यचिक्तसक यांचे नियोजनामध्ये कार्यक्रम राबविण्यात येत आहे. यामध्ये सर्व शासकीय आरोग्य संस्थेत म्हणजेच प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालय इत्यादी ठिकाणी मोफत ईसीजी तपासणी करण्यात येत आहे. ईसीजी मध्ये काही आढळून आल्यानंतर सदर रुग्णांना पुढील तपासणी व उपचाराकरिता संदर्भित करण्यात येणार आहे. व त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत.
हृदयरोगाचे कारणे : धूम्रपान, लठ्ठपणा, उच्च रक्तदाब, मधुमेह, उच्च कोलेस्टेरॉल, व्हायरल इन्फेक्शन, बॅक्टेरिया इन्फेक्शन, फंगल इन्फेक्शन, परजीवी इन्फेक्शन.
हृदयरोगाचे प्रकार : हृदयातील जन्मजात विकृती, अनियमित हृदयाचे ठोके, रक्तवाहिन्यांचे विकार, कोरोनरी धमनी रोग, हार्ट व्हॉल्व्ह रोग. हृदयरोगाच्या झटकेची शक्यता कमी करण्यासाठी काय करावे? आहारात बदल करावा, व्यायाम करावा, औषधे घ्यावीत, रक्तदाब नियंत्रित ठेवावा, कमी सोडियमयुक्त आहार घ्यावा.
हदयरोगाची लक्षणे : छातीत दुखणे श्वास घेण्यास त्रास होणे घाम येणे पाय गुडघे तळपायावर सूज येणे अचानक घोरणे छातीत धडधडणे, चक्कर येणे आणि अकल्पनीय तीव्र थकवा ही सामान्य लक्षणे आहेत. धाप लागणे आणि हृदयाचे अनियमित ठोके, ज्याला धडधडणे म्हणतात, हे वैशिष्ट्यपूर्ण आहेत. ॲट्रियल फायब्रिलेशन, हार्ट ऍरिथमियाचा एक प्रकार, कमी उर्जा, डोके हलकेपणा, श्वासोच्छवासाच्या समस्या आणि छातीत अस्वस्थतेची भावना होऊ शकते.
हृदय रोगाची लक्षणे आढळून आलेल्या रुग्णांनी आपले जवळच्या शासकिय आरोग्य संस्थेत तपासणी करून घेण्यात यावी .सदरची तपासणी 100 टक्के मोफत करण्यात येत आहे .तसेच लक्षणे नसलेल्या नागरिकांनी ज्यांचे वय तीस वर्षे पेक्षा जास्त आहे त्यांनी देखील ईसीजी तपासणी करून घ्यावी .असे आव्हान डॉक्टर बळीराम गाढवे, जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी केले आहे.
00000
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा