पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा; सावित्रीच्या 72 लेकींना मिळाली रोजगार संधी




अकोला, दि.8(जिमाका)- जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून जिल्हाधिकारी कार्यालयात आज महिला उमेदवारांसाठी पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला.  या मेळाव्यास महिलांनी उत्स्फूर्त  प्रतिसाद देत भरती प्रक्रियेसाठी 153 उमेदवारांनी सहभाग नोंदविला. निवडप्रक्रियेनंतर सावित्रीच्या  72 लेकींची प्राथमिक निवड होऊन रोजगाराची संधी मिळाली आहे.

        जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि  अकोला शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांच्यावतीने रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्यात 1)  सनसाईन इंजिनिअरिंग अकोला, 2) ट्रेड कार्ट डिजीटल प्रा.लि. अकोला, 3) धुत ट्रान्समिशन फलोरा औरंगाबाद, 4) कल्याणी टेक्नोफोर्ज प्रा.लि. चाकण पुणे, 5) निपूण मल्टीसर्व्हीसेस औरंगाबाद व पूणे 6) जबल सर्किट प्रा.लि. रांजनगाव, 7) भारतीय जीवन विमा निगम, अकोला  या कंपन्यांनी सहभाग नोंदविला. 228 पदांसाठी ही भरती  प्रक्रिया राबविण्यात आली.  भरती प्रक्रियेसाठी 153 महिला उमेदवारांनी आपला सहभाग नोंदविला. त्यात निवडप्रक्रियेनंतर 72 जणींची  प्राथमिक निवड करण्यात आली.

             उमेदवारांकरीता रोजगार मेळाव्याच्या ठिकाणीच नोंदणीकरण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी निमा अरोरा, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, जिल्हा रोजगार स्वयंरोजगार व कौशल्य विकास विभागाचे सहायक आयुक्त द.ल. ठाकरे, सूचना विज्ञान अधिकारी अनिल चिंचोले यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. तसेच जिल्हा रोजगार स्वयंरोजगार व कौशल्य विकास विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. महिला दिनाच्या निमित्त आयोजित या महिला रोजगार मेळाव्यात सावित्रीच्या ७२ लेकींना रोजगाराची संधी मिळाली.

०००००


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ