मागास घटकांना स्वयंरोजगाराच्या संधी देऊन मुख्यप्रवाहात आणावे - राष्ट्रीय अनु.जाती आयोगाचे सदस्य सुभाष पारधी





अकोला दि.२५(जिमाका)- समाजातील मागास घटकांना विविध प्रकारचे अर्थसहाय्य योजनांचा लाभ देऊन त्यांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करुन द्याव्या व त्यांना मुख्य प्रवाहात आणावे, असे निर्देश राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे सदस्य सुभाष पारधी यांनी आज येथे दिले.

राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे सदस्य सुभाष पारधी हे अकोला दौऱ्यावर आले असता त्यांनी जिल्हा प्रशासनाकडून आढावा घेतला. शासकीय विश्रामगृहावर ही बैठक पार पडली. या बैठकीस पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अति. पोलीस अधीक्षक मोनिका राऊत, समाज कल्याण अधिकारी डी.एम.पुंड, समाज कल्याण निरीक्षक सुसतकर आदी उपस्थित होते.

जिल्हा प्रशासनातर्फे अनुसूचित जाती घटकांच्या विकासासाठी राबविण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती यावेळी सादर करण्यात आली. तसेच पोलीस विभागातर्फे अनुसूचित जाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये दाखल प्रकरणांची माहिती सादर करण्यात आली.

मागास घटकांच्या सर्वांगिण विकासासाठी त्यांना रोजगार-स्वयंरोजगार संधी उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे. त्यासाठी विविध बॅंकांमार्फत व्यवसायासाठी अर्थसहाय्य दिले जाते. त्यातील प्रलंबित प्रकरणांचा आढावा घ्यावा. तसेच विनाकारण कोणतेही प्रकरण प्रलंबित राहणार नाही याची दक्षता घ्यावी.  हा आढावा १४ एप्रिलपर्यंत पूर्ण करुन आयोगास अहवाल सादर करावा, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले. अनुसूचित जाती बहुल वस्त्यांमध्येही विकासकामे प्राधान्याने घेण्यात यावी, असेही त्यांनी सांगितले.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ