इयत्ता १० वी, १२ वी च्या विद्यार्थ्यांच्या वाढीव क्रीडा गुणांचा प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

  अकोला  दि.२०(जिमाका)- माध्यमिक (इयत्ता १० वी) व उच्च माध्यमिक (इयत्ता १२ वी) शालांत प्रमाणपत्र परीक्षेस प्रविष्ट विद्यार्थ्यांना वाढीव क्रीडा गुणांचा प्रस्ताव शाळा- महाविद्यालयाच्या मुख्याध्यापक/ प्राचार्यांनी दि.१० एप्रिल पर्यंत पाठवावा,असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी सतीशचंद्र भट यांनी केले आहे.

 या प्रस्तावास शाळा महाविद्यालयाचे पत्र, अर्जाचा नमुना, खेळाडुचे परीक्षा प्रवेशपत्र,  क्रीडा प्रमाणपत्र हे दोन प्रतित सादर करावे. तसेच https://aaplesarkar.mahainline.gov.in  या संकेतस्थळावर खेळाडूंची राज्यस्तर/ राष्ट्रस्तर किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेतील सहभागाची माहिती खेळ निहाय भरावी. जिल्हा व विभागस्तरावर सहभागी असणाऱ्या खेळाडू विद्यार्थ्यांचे प्रस्ताव ऑफलाईन स्विकारले जातील. अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अकोला, जिल्हा क्रीडा संकूल, स्व. वसंत देसाई स्टेडियम, स्टेशन रोड अकोला येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी सतीशचंद्र भट यांनी केले आहे.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ