जलजागृती सप्ताहाचे उद्घाटन :जलजागृती वर्षभर आवश्यक- निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे

 



 अकोला  दि.१६(जिमाका)- पाणी हे जिवनावश्यक असून दररोजच्या जीवनात ते अत्यंत आवश्यक आहे. अशा पाण्याच्या वापरासंदर्भात जनजागृती ही सुद्धा दररोज असावी. त्यामुळे जलजागृती ही वर्षभर आवश्यक असल्याचे प्रतिपादन निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी केले.

जागतिक जलदिन दि.२२ मार्च निमित्ताने जलसंपदा विभागातर्फे जलसंवर्धन व जलबचतीचे महत्त्वाबाबत जनजागृतीसाठी  दि.१६ ते २२ दरम्यान जलजागृती सप्ताह राबविण्यात येतो. या सप्ताहाचे उद्घाटन निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांच्या हस्ते करण्यात आले.  अकोला सिंचन मंडळ कार्यालयात हा  कार्यक्रम पार पडला.  अकोला सिंचन मंडळाचे अधीक्षक अभियंता योगेश दाभाडे, कार्यकारी अभियंता अ.खु. वसुलकर, लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता अमित राऊत,  शिल्पा आळशी,  निर्गूणा प्रकल्प सगुणा पाणी वापर संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब देशमुख, राजेंद्र देशमुख, डॉ. अशोक मेटकर, केशवराज पाणी वापर संस्थेचे अध्यक्ष ॲड मुमताज देशमुख आदी उपस्थित होते.

दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. काटेपूर्णा, वान, निर्गुणा, विद्रूपा, मोर्णा या नद्यांच्या जलकलशाचे पूजन करण्यात आले. जलप्रतिज्ञेचे वाचन झाले. प्रास्ताविक योगेश दाभाडे यांनी केले. पाणी वापर संस्थेच्या अध्यक्षांनी पाणी वापर संस्थेच्या केलेल्या कार्याची माहिती उपस्थितांना दिली.सूत्रसंचालन स्नेहल सोनटक्के यांनी तर आभार वसुलकर यांनी मानले. जलजागृती सप्ताहानिमित्त पाणी बचतीचे महत्त्व याबाबत माहिती देण्यासाठी व जनजागृती व्हावी यासाठी  चित्ररथ जिल्हाभरात नेण्यात येणार आहे. त्यास हिरवी झेंडी दाखवून रवाना करण्यात आले.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ