राष्ट्रीय युवा स्वयंसेवकांसाठी ऑनलाईन अर्ज मागविले


     अकोला, दि.10(जिमाका)- जिल्ह्यात युवकांचे नेटवर्क तयार करणे, राष्ट्रनिर्माण कार्य तसेच केंद्र शासनाचे विविध कार्यक्रम राबविण्याकरीता नेहरु युवा केंद्रामार्फत राष्ट्रीय युवा स्वयंसेवकासाठी ऑनलाईन अर्ज मागविले आहे. पात्र इच्छुक उमेदवारांनी तालुकानिहाय राष्ट्रीय युवा स्वयंसेवाकाच्या निवडीकरिता शुक्रवार दि. 24 मार्चपर्यंत ऑनलाईन अर्ज करावा, असे आवाहन नेहरु युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी यांनी केले आहे.

             युवकांनी त्यांची उर्जा व क्षमता यांची स्वयंसेवेच्या माध्यमातून राष्ट्रनिर्माण कार्यात योग्य वापर करणे तसेच साक्षरता, आरोग्य, स्वच्छता, लिंगभेद, सामाजीक समस्येबाबत जागरूकता अभियान राबविणे तसेच विविध कार्यक्रमामध्ये प्रमुख भूमिका निभावणे आणि विविध कार्यक्रमांचे आयोजन करणे, आपातकालीन परिस्थितीमध्ये प्रशासनास मदत करणे अशा विविध कार्यक्रमात युवकयुवतीचा सहभाग घेण्यासाठी तालुकानिहाय युवकांची निवड करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील तालुकानिहाय प्रत्येकी दोन प्रमाणे एकूण 14 व कार्यालयाकरीता दोन असे एकूण 16 युवकयुवतीकरिता ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहे.

पात्रता : किमान एस.एस.सी. (10 वी ) उत्तीर्ण, उच्च शिक्षण, पदवी, पदव्युत्तर व बेसिक कंप्युटरचे ज्ञान असलेल्यांना प्राध्यान्य राहिल.  उमेदवारांकडे स्मार्ट मोबाईल फोन व त्याचे विविध अपसंबंधी बेसिक माहिती ई-बँकींग डीजीधन, सोशल मिडिया इत्यादी ज्ञान असलेल्यांना प्रथम प्राधान्य राहिल. नेहरू युवा केंद्र संगठन सोबत सलगणित युवा मंडळाच्या युवकांना प्राधान्य, शिक्षण सुरु असणाऱ्या युवक युवती यापदा करीता पात्र ठरणार नाही. अर्जदार हा 18 ते 29 वयोगटातील म्हणजेच  दि. 1 एप्रिल 2023 रोजी 18 वर्ष पूर्ण व 29 वर्षापेक्षा कमी असावा. तसेच अर्जदार ज्या तालुक्याकरीता अर्ज करीत असेल त्या तालुक्यातील रहीवासी असावा आणि त्याच तालुक्यात त्याला काम करावे लागेल.

अर्ज कसा करावा : नेहरू युवा केंद्र संगठनची वेबसाईट www.nyks.nic.in वर या योजनेची संपूर्ण माहिती उपलब्ध आहे.  ऑनलाइन अर्ज करण्यास अडचण येत असल्यास नेहरू युवा केंद्र,स्व. वसंत देसाई स्टेडियम,रेल्वे स्टेशन रोड अकोला येथे संपर्क साधावा.

000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ