जिल्हा माहिती कार्यालयाचे प्रचार रथ मार्गस्थ १४९ गावांमध्ये पोहोचणार शासनाच्या योजनांची माहिती





 अकोला,दि.८(जिमाका)-  शासनाच्या सामाजिक न्याय तसेच विविध विभागांच्या लोककल्याणाच्या योजनांची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवणारे कलापथक व चित्ररथ अशा दोन्ही प्रचाररथांना आज जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून मार्गस्थ करण्यात आले.  शासनाच्या लोककल्याणकारी योजनांचा विद्यार्थी व नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी यावेळी केले. हे प्रचाररथ जिल्ह्यातील १४९ गावांमध्ये शासनाच्या योजनांची माहिती पोहोचविणार आहेत.

सामाजिक न्याय विभागामार्फत अनुसूचित जाती घटकांसाठी  तसेच सामान्य योजनेद्वारे जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीतून  जिल्हा माहिती कार्यालयामार्फत हा उपक्रम राबविला जात आहे. आज महिला दिनाचे औचित्य साधून प्रचार अभियानास सुरुवात झाली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त द.ल. ठाकरे, महिला बालविकास अधिकारी विलास मरसाळे, माविमच्या वर्षा खोब्रागडे,सुचना विज्ञान अधिकारी अनिल चिंचोले, जिल्हा माहिती अधिकारी डॉ. मिलिंद दुसाने आदी उपस्थित होते.

सामाजिक न्याय विभागाच्या विशेष घटक योजनेतून विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतिगृहे, विविध शिष्यवृती योजना, आंतरजातीय विवाह प्रोत्साहन, शासकीय पुनर्वसन योजना, राजर्षि शाहू गुणवत्ता पुरस्कार, सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती, आर्थिक सहाय्य योजना, कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण योजना, कन्यादान योजना, स्वाधार योजना इ. योजनांची माहिती कलापथक व चित्ररथ माध्यमातून देण्यात येणार आहे. चित्ररथामध्ये असणाऱ्या एलईडी दृकश्राव्य चित्रफितींच्या माध्यमातून व फ्लेक्स बोर्डांद्वारे माहिती दिली जाणार आहे. लोककलावंतांच्या कलापथकांमार्फत लोकनाट्य, पथनाट्य व  भारुड या लोकप्रिय कलाप्रकारांच्या माध्यमातून शहरी व ग्रामीण भागातील जनतेपर्यंत पोहोविले जाईल. हे प्रचाररथ जिल्ह्यातील  सर्व तालुक्यात प्रामुख्याने ग्रामीण भागात फिरणार आहे.जिल्ह्यातील १४९ गावांमधून हे अभियान राबविले जाणार आहे.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ