शासकीय कार्यालयांमध्ये 1 एप्रिलपासून ‘ई-ऑफिस’ प्रणाली


अकोला, दि. 2 (जिमाका)-  प्रशासकीय कामकाज अधिक गतिमान आणि ‘पेपरलेस’ होण्यासाठी येत्या 1 एप्रिलपासून जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये ‘ई-ऑफिस’ प्रणाली सुरु करण्यात येईल. त्याअनुषंगाने सर्व शासकीय कार्यालयाने पूर्वतयारी करुन कार्यालयातील दस्तावेज ऑनलाईन करुन घ्यावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी केले.

            जिल्हाधिकारी कार्यालयाच्या लोकशाही सभागृहात ई-ऑफीस प्रणाली अंमलबजावणी संदर्भात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. यावेळी अपर जिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार, जिल्हा पुरवठा अधिकारी बबन काळे, सूचना प्रसारण अधिकारी अनिल चिंचोले, जिल्हा नियोजन कार्यालयाचे सहायक नियोजन अधिकारी कैलास देशमुख तसेच  सर्व शासकीय अधिकारी व कर्मचारी आदि उपस्थित होते.

            कार्यशाळेत निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे म्हणाले की, सर्व शासकीय कार्यालयांमध्ये ‘ई-ऑफिस’ प्रणालीचा वापर सुरू केल्यास कामकाजाला गती येईल. शिवाय कामकाज संपूर्णपणे कागदविरहीत (पेपरलेस) होणार असल्याने अधिक सुलभता येणार आहे. त्यामुळे येत्या 1 एप्रिलपासून ‘ई-ऑफिस’ प्रणाली सुरू करण्यासाठी सर्व कार्यालयाने पुढाकार घेवून ई-ऑफीस प्रणालीचा वापर करावा, असे सूचना निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिल्या.

0000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ