कोरोनाः ‘शुन्य’ पॉझिटीव्ह, एक डिस्चार्ज


            अकोला दि.23(जिमाका)- आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर) चार अहवाल प्राप्त झाले. त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही. तर  एकाला डिस्चार्ज देण्यात आला आहे, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

आजचे एकूण पॉझिटीव्ह-आरटीपीसीआर(शा.वै.म. 0 व खाजगी 0)0+रॅपिड ॲन्टीजेन चाचणी 0=एकूण पॉझिटीव्ह 0.

आरटीपीसीआर ‘शुन्य’

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतील आरटीपीसीआर चाचण्यात कोणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त झाली.

सक्रिय रुग्ण ‘12’

जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 66106(49973+15142+991)आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात 12 सक्रिय रुग्ण आहेत, त्यातील दोन रुग्णालयात दाखल असून उर्वरीत 10 जणांवर होम आयसोलेशन मध्ये उपचार सुरु आहेत. तर एका रुग्णाला उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे, अशी माहिती  जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे. 

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ