राष्ट्रीय क्षयरोग दुरिकरण कार्यक्रम; सक्रिय क्षयरूग्ण शोध मोहिम राबवा-निवासी उपजिल्हाधिकारी

 




अकोला, दि.10(जिमाका)- राष्ट्रीय क्षयरोग दुरिकरण कार्यक्रमांतर्गत क्षयरोग बाधितांना योग्य औषधापचार मिळावा याकरीता दि. 21 मार्चपर्यंत क्षयरुग्ण शोध मोहिम राबविण्यात येणार आहे.  याकरीता प्रशिक्षीत आरोग्य कर्मचारी व स्वयंसेवकांनी गृहभेटी देऊन सक्रिय क्षयरुग्ण शोध मोहिम राबवावी, असे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यानी दिले.

निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या दालनात राष्ट्रीय क्षयरोग दुरिकरण कार्यक्रमातंर्गत डिस्ट्रीक टास्क फोर्स आढावा बैठक पार पडली. यावेळी अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शंशिकांत पवार, माता व बाल संगोपण अधिकारी डॉ. विनोद करंजीकर, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. मनिष शर्मा, तालुका आरोग्य अधिकारी आदि उपस्थित होते.

निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी निर्देश दिले की, झोपडपट्टी, विट भट्टी,  स्तलांतरीत कामगार, बे,  वृध्दाश्रम, आश्रमशाळा इत्यादी ठिकाणी सक्रिय क्षयरोग बाधीतांची शक्यता जास्त असते. अशा ठिकाणी आरोग्य कर्मचारी, आशा, अंगणवाडी सेविका व सामाजिक कार्यकर्ते यांचेमार्फत घरोघरी जाऊन जोखीमग्रस्त भागातील प्रत्येक घराचे सर्वेक्षण करावे. लक्षणे आढळलेल्या व्यक्तीचे थुंकी नमुने, क्ष किरण तपासणी व इतर आवश्यक चाचण्यांव्दारे क्षयरोगाचे निदान करुन त्याप्रमाणे क्षयरुग्णास औषधोपचार सुरू करावे.

जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील 1 लक्ष 46 हजार 258 घरांना भेटी देवून सर्व्हेक्षणाव्दारे क्षयरोग रुग्णांचा शोध घेण्यात येईल.  त्यासाठी 73 चमू तयार करण्यात आले आहेत. हे चमू दि. 8 ते 21 मार्च या कालावधीत घरोघरी  भेट देणार आहेत. या सर्वेक्षणाचे काम आशा सेविका व पुरुष स्वंयसेवक करणार आहे. क्षयरोग रोगाची लक्षणे आढळल्यास रुग्णांच्या थुंकीचे एक तासाच्या अंतराने दोन नमूने घेण्यात येतील. आवश्यकता वाटल्यास छातीचा  एक्स-रे काढण्यात येईल. तसेच कुष्ठरोगाची लक्षणे आढळल्यास त्यांची प्राथमिक तपासणी करण्यात येईल.  यासाठी सर्व नियोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. मनिष शर्मा यांनी दिली.

 क्षयरोगाची संभाव्य लक्षणे : दोन आठवड्यापेक्षा जास्त कालावधीचा खोकला किंवा दोन आठवडयापेक्षा मुदतीचा ताप, मागील तीन महिन्यामध्ये वजनात लक्षणीय घट, मागील सहा महिन्याच्या कालावधीत कधीही थुंकीवाटे रक्त पडत असल्यास, एक महिन्यापासून छातीत दुखणे किंवा उपचार घेत असेल, असे लक्षणे दिसताच तपासणी करून घ्यावी.

000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ