विशेष लेख : श्वान दंश,रेबिज रोगाच्या प्रादुर्भावावर उपाययोजना

रेबीज हा रोग उष्णरक्त वर्गीय प्राण्यामध्ये दिसून येणारा अत्यंत घातक विषाणूजन्य रोग आहे. या रोगाचे विषाणू पशुधनाच्या मज्जासंस्थेस बाधीत करतात. बाधीत पशुधनाच्या ज्या भागात मज्जासंस्थेचे दाट जाळे अशा भागातील स्त्रावातून हे विषाणू शरीरातून बाहेर पडतात. जसे पशुधनाच्या तोंडातून येणारी लाळ बाधीत पशुधनाच्या चावण्याने(दंश) या विषाणूचा प्रामुख्याने प्रसार होतो. हा रोग झुनॉटीक म्हणजे प्राण्यांपासून मानवाला होतो.

रेबीज रोगाविषयी माहिती

1.      संशयास्पद श्वानदंश आजारी पशुधनाबाबत श्वान दंश झाल्याचा किंवा पिसाळलेला भटका कुत्रा परिसरात आल्याचा पूर्व इतिहास माहिती असणे आवश्यक आहे.

2.       बाधीत पशुधनास रेबीज झाल्याचा संशय बळावत असेल तर अशा पशुधनास हाताळू नये.

3.      बाधीत पशुधनास उपचार करणे निरुपयोगी ठरते.

4.    संशयास्पद किंवा बाधीत पशुधनाचे विलगीकरण करावे.

5.     अशा पशुधनांचा उरलेला चारा, पिण्याचे पाणी, भांडी,  शेड व परिसराचे निर्जंतुकीकरण करावे. (कार्बोलिक अॅसिड, सोप सोल्युशन अथवा डीटर्जेंट द्रावणाने).

6.     बाधीत पशुधनास हाताळताना ग्लोज वापरुन नष्ट करावीत.

7.     बाधीत पशुधन मृत झाल्यास शवविच्छेदन करीत असतांना व्यक्तिगत जैवसुरक्षा साधणे. जसे पीपीई कीट, ग्लोज, मास्क फेसशिल्ड वापरावा. शवविच्छेदनानंतर सर्व साहित्य नष्ट करावे.

8.     शवविच्छेदनानंतर मृत शरीराची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावावी. जेणे करून वन्य प्राणी व मांसभक्षक  प्राणी बाधीत पशुधनाच्या संपर्कात येऊन रोग संक्रमित किंवा रोगाचा प्रसार होणार नाही.

श्वानदंश झाल्यास करावयाच्या उपाययोजना

1. मज्जा संस्थेसंबंधी लक्षणे दिसून आल्यास अशा पशुधनातील उपचार काळजीपूर्वक व संरक्षक प्रावणे(पीपीई फीट, ग्लोब्ज, मास्क, फेसशिल्ड) वापरावी.

2. बाधीत पशुधन चावल्यास किंवा लाळेशी संपर्क आल्यास साबणाच्या द्रावणाने किंवा डिटर्जंटच्या द्रावणाने जखम धुवुन काढावी. जखमेवर २ टक्के अॅक्वियस क्वाटर्नरी अमोनियम कंपाऊंड लावावे. त्यानंतर टीक्चर आयोडीन, पोव्हीडोन आयोडीन लावावे जखमेस पट्टी बांधू नये.

प्रतिबंधक लसिकरण

श्वानदंश किंवा रेबीज प्रतिबंधासाठी श्वानदंशापुर्वी व श्वानदंशानंतर अशा दोन प्रकारे लसिकरण करण्यात येते.

श्वानदंशापुर्वी करावयाच्या लसिकरण पध्दती : प्राथमिक लसिकरण सर्व साधारणण प्रतिबंधात्मक लसीची तीन इंजेक्शने वेळापत्रक- शुन्य दिवस, सातव्या दिवस आणि 21 किंवा 28 व्या दिवशी. बुस्टर लसीकरण प्राथमिक लशीकरणानंतर एका वर्षाने. तथापि लस उत्पादकांच्या सूचनांनुसार लसीकरण वेळापत्रक व लस मात्राची संख्या याचे तंतोतंत पालन करावे.

श्वानदंशानंतर करावयाच्या लसिकरण पध्दती : श्वानदंश प्रतिबंधात्मक लसीकरण न केलेले पशुधन तसेच  प्रतिबंधात्मक लसिकरानानंतर प्रतिबंधात्मक संरक्षण कालावधी उलटून गेला असेल अशा पशुधनाची लसीची पाच इंजेक्शन द्यावीत. वेळापत्रक याप्रमाणे: शुन्य दिवस, तिसरा दिवस, सातवा दिवस, 14 आणि 28 दिवशी. श्वानदंश प्रतिबंधात्मक लसीकरण केलेले व प्रतिबंधात्मक संरक्षण कालावधीत श्वानदंश झालेला असल्यास अशा पशुधनास  लसीची दोन  इंजेक्शने द्यावी लागतात. त्या लसीकरणाचे वेळापत्रक ज्या दिवशी पहिली लस घेतली तो शुन्य दिवस असून त्या नंतर तिसऱ्या दिवसाने दुसरी लस घेण्यात यावी. लस उत्पादकांच्या सूचना, वेळापत्रक व लसमात्रांची संख्या यांचे तंतोतंत पालन करावे.

माहिती: जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त कार्यालय, अकोला

संकलनः जिमाका, अकोला.

000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ