पोलीस भरती परिक्षा; शहरातील पर्यायी मार्गाने वाहतूक


अकोला,दि.30(जिमाका)-  जिल्हा पोलीस विभागाव्दारे पोलीस भरती लेखी परिक्षा रविवार दि. 2 एप्रिल रोजी सकाळी 9 वाजेपासून आयोजीत करण्‍यात आली आहे. त्याअनुषगाने लेखी परिक्षा दरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहणे तसेच वाहतुकीचा अडथळा होऊ नये याकरिता अकोला शहरातील लक्‍झरी बसस्‍टॅण्‍ड ते सरकारी बगीचा या मार्गावरील जाणे व येणारी सर्व प्रकारची वाहतूक रविवार दि.2 एप्रिलचे सकाळी 6 वाजेपासून ते दि. 2 एप्रिलचे 12.00 वाजे पर्यंत पुर्णपणे बंद करुन पर्यायी मार्गाने सर्व प्रकारच्या वाहतूक वळविण्याचे आदेश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी निर्गमित केले आहे.

आदेशात म्हटल्याप्रमाणे रविवार (दि.2) रोजी सकाळी सहा वाजेपासून ते रात्री बारा वाजेपर्यंत लक्‍झरी बसस्‍टॅण्‍ड- निमवाडी पोलीस वसाहत समोरुन-जेल चौक-अशोक वा‍टिका-शासकीय रुग्‍णालय-जिल्‍हाधिकारी कार्यालय-सरकारी बगीचा या पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे.

000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ