महसुल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे अकोला विमानतळावर स्वागत

 




अकोला दि.२६(जिमाका)- राज्याचे महसूल, पशुसंवर्धन, दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे आज सायंकाळी सहा वा. सुमारास अकोला विमानतळावर आगमन झाले. यावेळी  विभागीय आयुक्त डॉ. निधी पांडे  यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी जिल्हाधिकारी श्रीमती निमा अरोरा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार यांनीही त्यांचे स्वागत केले. यावेळी विधानसभा सदस्य आ. रणधीर सावरकर, आ. हरिष पिंपळे तसेच निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपविभागीय अधिकारी बाळापूर डॉ. रामेश्वर पूरी आदी उपस्थित होते. अकोला विमानतळावरुन श्री. विखे पाटील हे मोटारीने शेगावकडे रवाना झाले.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना प्रोत्साहनपर लाभाच्या तरतुदीमुळे नियमित फेड करणाऱ्यांना दिलासा