जवाहर नवोदय विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना नॅशनल सायन्स ऑलिम्पियाड परीक्षेत सुवर्णपदक

 


अकोला दि.१५(जिमाका)- येथील जवाहर नवोदय विद्यालयातील विद्यार्थ्यांनी  नॅशनल सायन्स ऑलिम्पियाड स्पर्धेत सुवर्णपदक पटकावून अव्वल स्थान मिळविले आहे,असे प्राचार्य रविंद्र चंदनशिव यांनी कळविले आहे.

विद्यालयाचे मानसी वानखेडे,प्रणव देशमुख,अंकुश रेखाते, संकेत कासवाणी,अनुज प्रताप, कु.ऋतुजा गव्हाणगुरु, प्राची वाधवाणी,दीपांशू जोगदंड,कु.पल्लवी निमकंडे आणि प्रेम गावंडे यांनी सुवर्णपदक मिळवून यश संपादन केले.प्राचार्य रविंद्र चंदनशिव, उपप्राचार्य श्रीमती कविता चव्हाण यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना सुवर्णपदक देऊन त्यांचे कौतूक करण्यात आले. सायन्स ऑलिम्पियाड ही परीक्षा आंतरराष्ट्रीयस्तरावर घेण्यात येते. विद्यार्थ्यांना या परीक्षेसाठी वामसी सर यांनी मार्गदर्शन केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ