शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाव्दारे ‘मिशन थायरॉईड’; दर गुरुवारी ओपीडीत होणार उपचार


अकोला,दि.31(जिमाका)-  वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाअंतर्गत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाव्दारे ‘मिशन थायरॉईड अभियान’ राबविण्‍यात येत आहे. या अभियानातंर्गत थायरॉईडच्या विविध रोगांनी ग्रस्त रुग्णांवर औषधोपचार केला जाणार आहे. याकरिता दर गुरुवारी दुपारी 12 वाजता शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामधील औषधवैधकशास्त्र विभागात विशेष थायरॉईड ओपीडी चालविली जाणार आहे. या सुविधेचा थायरॉईड रुग्णांनी लाभ घ्यावा, असे आवाहन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.मिनाक्षी गजभिये यांनी केले.

            थायरॉईड रोगासंदर्भात जनजागृती निर्माण व्हावी यासाठी ‘मिशन थायरॉईड अभियान’ राबविण्याचे निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी दिले. त्यानुसार दि. 30 मार्चपासून संपूर्ण राज्यात दर गुरुवारी विशेष थायरॉईड ओपीडी चालविली जाणार आहे. यामध्ये थायरॉईडच्या विविध आजारांच्या औषधोपचार व दृश्य स्वरुपातील थायरॉईडचे परिणाम जसे. अन्न घेताना त्रास होणे, श्वास गुदमरणे, विविध कॅन्सर यासंबंधी शस्त्रक्रियाची सोय शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपलब्ध करुन दिली जाणार आहे.

            थायरॉईड अभियानाची सुरुवात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात गुरुवार दि. 30 मार्च रोजी जिल्ह्यातील वरिष्ठ फिजिशीयन डॉ. माहेश्वरी यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी अधिष्ठाता डॉ. मिनाक्षी गजभिये  व प्राध्यापक डॉ. मुकूंद अष्टपुत्रे यांनी थायरॉईड आजाराविषयी माहिती देऊन मार्गदर्शन केले. यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सुरु करण्यात आलेल्या ओ.पी.डीचे सर्व रुग्णांनी लाभ घ्यावा, असे आवाहन शासकीय वैद्यकिय महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांनी केले.  

000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ